पत्रकारांच्या लेखणी मुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो समाजात बदल घडवून आणण्याची संपूर्ण क्षमता पत्रकारांमध्ये असते – पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले 

गंगापूर (प्रतिनिधी)पत्रकारांची कुशलता आणि योगदान हे देश घडवित असते पत्रकारांच्या लेखणी मुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो समाजात बदल घडवून आणण्याची संपूर्ण क्षमता पत्रकारांमध्ये असते – पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले

   दर्पण दिनानिमित्त गंगापूर पोलीस स्टेशन, समाजसेवक अमोल दादा जगताप व राहुल वानखेडे मित्र मंडळ , सम्राट इस्टेटचे वाजीद कुरेशी, शिक्षक पतसंस्था गंगापूर व रेणुका माता मल्टीस्टेट यांच्यावतीने तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

६ जानेवारी दर्पण दिनानिमित्त गंगापूर पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व दर्पणदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

  सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तदनंतर गंगापुर  नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांकडून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना पत्रकारांनी निर्भीडपणे जनतेच्या  समस्या मांडल्याच  पाहिजे पत्रकारांच्या लेखणी मुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो पत्रकारांची कुशलता आणि योगदान हे देश घडवित असते असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी केले.

तसेच जेष्ठ पत्रकार आयुब पटेल यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती दिली दिली तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या मांडल्या तसेच शासनाने श्रमिक पत्रकारांप्रमाणे सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली.या प्रसंगी जिल्हा राष्ट्रवादी नेते वाल्मिक शिरसाठ व ज्येष्ठ पत्रकार बाबुराव नरोडे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मीकांत माघाडे यांनी केले .

   या कार्यक्रमासाठी गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे ( शरद पवार ) जिल्हा सरचिटणीस वाल्मिक शिरसाठ , भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विजय बन्सोड, महाराष्ट्र सचीव आयुब पटेल, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी रमाकांत बनसोड, प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष लालखाँ पठाण , भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे अलिम चाउस, शिवप्रसाद बन्सोड,अतुल रासकर, बाबूराव नरवडे ,इब्राहिम शेख, मकसूदखान लोधी, जमील पठाण, धनंजय ठोंबरे, सदाशिव जंगम, अमर बाहशवान, महंमद तांबोळी, लक्ष्मीकांत माघाडे, रमेश ठोंबरे राजेंद्र जाधव, गिरीश गंगापूरकर, नदिम बागवान, बाळासाहेब वाघमारे, विशाल जोशी, दत्तात्रय जोशी, रशीद शहा, सुभान शहा,जावेद मनियार,संतोष जोशी, सुभान शहा, राजू जाधव, साजिद तांबोळी, शिवराज केदारे,रामचंद्र बिरुटे, सचिन कुशेर , अमोल आंळजकर,आदि पत्रकार तथा फोटोग्राफर संतोष जोशी, राजेंद्र जाधव , प्रशांत लांडे, आदींची उपस्थिती होती. तसेच पोहे का अमोल कांबळे, राहुल वडमारे, तसेच पोलीस कर्मचारी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मीकांत माघाडे,यांनी केले. तर आभार हरुण पठाण यांनी मानले.

अमोल जगताप मित्र मंडळाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक संदीप दांरुटे, संतोष अंबिलवादे, रामेश्वर नावंदर, संदीप साबणे,अमोल जगताप, राहुल वानखेडे, राकेश कळसकर,अख्तर सैय्यद,गुलाम शहा, प्रा.विशाल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!