आमदार प्रशांत बंब यांची १६ आक्टोंबरला आमसभा

गंगापूर (प्रतिनिधी) आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली १६ आक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता येथील शिवकृपा मंगल कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचायत समिती गंगापूरची २०२३-२४ ची आमसभा दिनांक १६ आक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली व वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या सहअध्यक्षेतेखाली शिवकृपा मंगल कार्यालय वैजापूर रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या आमसभेस गंगापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,सोसायटीचे चेअरमन, राशन दुकानदार व तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुहास वाकचौरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!