अकोलीवाडगावच्या सरपंच कविता दाभाडे यांचा पदावरून पायउतार


गंगापूर (प्रतिनिधी) नियमबाह्य कृत्य केल्यामुळे अकोलीवाडगांव येथील सरपंच कविता दाभाडे यांना पदावरून काढून टाकल्याचे आदेश अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब जालिंदर बेलदार यांनी दिले आहेत.

गंगापूर तालुक्यातील अकोलीवाडगांव येथील सरपंच कविता दाभाडे यांनी ग्रामसभेतून ग्रामविकास समित्या स्थापन न करता मासिक बैठकीतून ग्रामविकास समित्या स्थापन करण्यात आल्याने तसेच केंद्रिय वित्त आयोगाच्या निधीमधून करण्यात येणारी सर्व देयके पी. एफ. एम. एस प्रणालीवरून करण्याचा नियम असताना पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना सरपंच पदावरून काढून टाकल्याचे आदेश अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब जालिंदर बेलदार यांनी दिले आहे.
गंगापूर तालुक्यातील अकोलीवाडगांव येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावात अल्पसंख्याक भागात पाईपलाईनचे कामे करण्यात आली होती या कामाचे देयके चेकद्वारे अदा करता येणार नाही असे स्पष्ट आदेश असतांना सरपंच कविता दाभाडे यांनी दिनांक ०८ एप्रिल २०२१ रोजी धनादेशाद्वारे रुपये ५५०००/- नियमबाह्यरित्या अदा केले त्याच प्रमाणे विविध ग्रामविकास समित्यांची स्थापना ग्रामसभेतून न करता मासिक बैठकीतून स्थापन
करण्यात आल्या.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्या ग्रामसभा, पंचायतीशी विचार विनिमय करून, पंचायतीचे सदस्य, ग्रामपंचायत क्षेत्रात काम करणाऱ्या समुहाधारीत संघटनांचे प्रतिनिधी, पंचायती, जिल्हा परिषद, राज्य शासन आणि मतदार, ग्रामस्तरावरील कार्यकर्ते यांच्यामधून ग्रामविकास समित्या गठीत कराव्यात अशी कायदेशीर तरतूद असतांना सरपंच कविता यांनी नियमबाह्यरित्या ग्रामविकास समित्या स्थापन केल्याचे स्पष्ट होते.
त्यामूळे सरपंच कविता दाभाडे यांनी ग्रामपंचायतीत नियमबाह्य कृत्य करण्यात आल्याचा ठपका ठेवून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार कार्यवाही करण्याची केलेली शिफारस तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांचा अहवाल मान्य करुन पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना सरपंच पदावरून काढून टाकल्याचे आदेश अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब जालिंदर बेलदार यांनी दिले आहेत. याबाबत उपसरपंच सविता अशोक जाधव ,सदस्य सोमिता गणेश नरोडे,सविता रोहिदास जाधव,बशीर महम्मद सैय्यद,,शिवाजी भाऊसाहेब वायकर यांनी तक्रार दाखल केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!