येणाऱ्या काळात शेतकऱ्याचा आवाज म्हणून भारत राष्ट्र समिती काम करेल :- बी आर एस नेते संतोष माने

गंगापूर प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी आसमानी सुलतानी तसेच शासनाच्या नाकर्तेपणामुळे संकटात असून येणाऱ्या काळात शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी भारत राष्ट्र समिती ताकतीने काम करणार असल्याचे मत भारत राष्ट्र समितीचे नेते संतोष माने यांनी व्यक्त केले.
पक्षाच्या सदस्य नोंदणी संदर्भात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी विनोद काळे,संपत रोडगे,बाळासाहेब शिंदे, समाधान गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, पद्माकर निकम, राजू सूकाशे, अनिल तुपे, दीपक साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.पक्षाची राज्यभरामध्ये 10 मे पासून सदस्य नोंदणी अभियान सुरू होत आहे त्या अनुषंगाने गंगापूर तालुक्यातील सर्कलनीय पदाधिकाऱ्याची बैठक घेऊन सदस्य नोंदणी संदर्भात सूचना देण्यात आल्या महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये किसान रथ प्रचार-प्रसार अभियान एक महिना चालेल. दहा लाख किलोमीटर प्रवास, २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये दीड हजारापेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे प्रचार वाहन प्रत्येक गावात फिरून भारत राष्ट्र समितीच्या पक्ष,किसान आघाडी, महिला, युवक, विद्यार्थी अशा विविध आघाडी व त्यांच्या समित्या गठीत करून पक्षांचे संघटन मजबूत करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्ष काम करत येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका,ग्रामपंचायत पक्षाचे उमेदवार उभे करून संपूर्ण ताकतीने निवडणुका लढवणार आहे या
वेळी गणेश चव्हाण, शारुख पटेल, स्वप्नील खवले, ऋषिकेश पाठे, प्रसाद भातोडेकर, अजय सोनवणे, योगेश शेजुल, प्रतीक लिंगायत, राहुल नारोडे, आकाश काटकर, आकाश जाधव, राजू जाधव, कृष्णा ताठे, नवनाथ बरबडे उपस्तित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!