जीव गेला तरी बेहत्तर मात्र पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलू देणार नाही

लासूर स्टेशनला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नैसर्गिक प्रवाह बंद करण्याचे प्रयत्न….संतोष पाटील माने

जीव गेला तरी बेहतर बेकायदेशीर ड्रेनेज लाईन होऊ देणार नाही अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरुद्ध लोकशाही मार्गाने उपोषण करणार…. संतोष अप्पा हिंगमिरे

गंगापूर (प्रतिनिधी)तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कायगाव तें देवगाव रस्त्यावरील सावंगी चौकातील अतिक्रमन सार्वजिक बांधकाम विभागाकडून पाडले तें बेकायदेशीर असून हे बांधकाम पाडून जी ड्रेनेज लाईन सार्वजिक बांधकाम विभागाकडून बाजार समितीसमोरील गीताबन येथून पावसाळ्यात वाहणारा ओढा आहे तो नैसर्गिक प्रवाह आहे तो नैसर्गिक प्रवाह बंद करून सरकारी करोडो रुपये खर्चून ओढ्याचा प्रवाह विरुद्ध दिशेला नेण्यासाठी जी कृत्रिम ड्रेनेज लाईन करण्याचा डाव सार्वजजिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत आखत आहे तो आम्ही कदापिही यशस्वी होऊ देणार नाही आम्हीही काहि हातात बांगड्या घातलेल्या नाही अशी प्रतिक्रिया बिआरएस चे नेते संतोष पाटील माने यांनी लासूर स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान यावेळी संतोष माने पुढे म्हणाले कीं सावंगी चौकातील अतिक्रमन बेकायदेशीर पाडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संभाजीनगर येथे पार पडली होती यां बैठकीत बेकायदेशीर अतिक्रमन पाडलेल्या लोकांना विश्वासात घेऊन व पूर्वसूचना देऊन अतिक्रमन धारकांचे समाधान झाल्यावर समंजस्यातून मार्ग काढला जाईल असा शब्द अधिकाऱ्यांनी दिला होता मात्र कोणाच्या तरी राजकीय दबावाला बळी पडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुठलीही पूर्वसूचना न देता ड्रेनेज लाईन करण्याचा घाट घालत आहे तो आम्ही कदापिही होऊ देणार नाही असे सांगितले. संतोष अप्पा हिंगमिरे यांनीही ड्रेनेज लाईंनचे काम हे बेकायदेशीर असून आम्ही मुबंई उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपिठात याबाबत दाद मागितली असून प्रकरण कायदेशीर प्रक्रियेत असतानाही सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी ड्रेनेज लाईन बाबत मनमानी करत आहे मात्र कितीही राजकीय दबाव आला तरी आम्ही माघार घेणार नसल्याचे सांगून जीव गेला तरी बेहत्तर मात्र पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलू देणार नसल्याचे सांगून लवकरच सार्वजिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरुद्ध लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे असे संतोष अप्पा हिंगमिरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी पत्रकार परिषदेस अनेक अतिक्रमण धारक कुटुंब उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!