शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला एसआरपीएफ पोलीस… अमळनेर वस्ती येथे इसाक शेख याचे जोरदार स्वागत

शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला एसआरपीएफ पोलीस… ,अमळनेर वस्ती येथे इसाक शेख याचे जोरदार स्वागत

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळनेर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी इसाक समद शेख याने नुकत्याच झालेल्या एसआरपी एफ पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केले असून त्यांची धुळे जिल्ह्यातील एस आर पी एफ पोलीस मध्ये भरती झाली आहे.सोमवारी ७ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व गावकऱ्यांनी त्याचा फेटाबांधून पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले.

अमळनेर वस्ती येथील इसाक समद शेख या शेतकऱ्यांच्या मुलाने प्रयत्न, मेहनत, चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.संपूर्ण गावातून इसाक व त्याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोमवारी सकाळी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर हभप मारुती महाराज जाधव, हभप नामदेव महाराज मिसाळ यांच्या हस्ते एसआरपीएफ मध्ये निवड झालेल्या इसाक शेख,गोळेगाव चे दादाभाई शेख,रहिमपूर चे इस्लाम शेख यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
इसाक हुशार असल्याने त्याला पोलीस भरतीची तयारी अभ्यास करण्याचा सल्ला त्याच्या मित्र व नातेवाईकांनी दिला. बीएमजी चे भाऊसाहेब गर्जे सर यांचे वेळोवेळी मिळाले मार्गदर्शन प्रेरणा प्रोत्साहन इसाक साठी ऊर्जेचा स्रोत ठरला. व
नुकत्याच झालेल्या एस आर पी एफ
पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून धुळे जिल्ह्यात इसाक चे सलेक्शन झाले.आई वडील व दोन्ही मोठ्या भावंडांनी वेळोवेळी आपल्या परीने जमेल तेवढी केलेली मदत खूपच उपयुक्त ठरली. असे सांगून माझ्या यशाचे श्रेय कुटुंबीयांना व मार्गदर्शक गर्जे सरांना देतो.असे इसाक ने सत्काराला उत्तर देतांना म्हटले.
कठीण परिस्थितीतून त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल अमळनेर वस्ती गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी त्याचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नवनिर्वाचित पोलीस इसाक शेख चे वडील समद शेख, आई अहेमदा शेख, भाऊ मुसताक शेख ,अशपाक शेख, गंगापूर साखर कारखान्याचे माजी संचालक रायभान भणगे,माजी उपसरपंच खंडेराव गवारे, लवकुश कर्जुले,ग्रा.पं. सदस्य रामेश्वर मिसाळ, शिक्षक सोमनाथ गाडेकर,माजी चेअरमन सोपान मिसाळ, ईसाभाई पठाण, राष्ट्रवादी कांग्रेस चे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रफिक पटेल,राजू पुरम,समद पठाण,अनिल भणगे,पांडुरंग मिसाळ,शेरखा पठाण,रावसाहेब सावंत,मचिंद्र भणगे,गोळेगाव येथील उद्योजक अल्ताफ सय्यद, सत्तार शेख,नामदेव मिसाळ,योगीनाथ मिसाळ,नारायण भरपुरे,रघुनाथ मिसाळ,असद शेख, कयूम पठाण, कडूभाई पठाण, व शाळेचे सर्वच शिक्षकवृंद,समस्त गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!