आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते दोन कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन

गंगापूर (प्रतिनिधी)ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष 2515) या योजनेंतर्गत तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून आ.सतीश चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

आमदार सतीश चव्हाण यांनी गळनिंब येथील मुंबादेवी चौक ते आंबेडकर चौक पर्यंत सी.सी.रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, आगरवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर सी.सी.रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, भिवधानोरा येथे मुंजाबा चौक परिसरात सी.सी.रस्ता तयार करण्यासाठी 10 लक्ष, गाव अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 10 लक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी 5 लक्ष, सावखेडा येथील कब्रस्तान परिसराचे लोकार्पण करण्यासाठी 10 लक्ष, अमळनेर येथे परमानंद गड परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी 5 लक्ष, कायगाव येथे बाजार पट्टीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी 9 लक्ष, रामेश्वर मंदिर पार्किंग परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 10 लक्ष, गणेशवाडी येथील गणपती मंदिर ते कायगाव पर्यंत सी.सी.रस्ता करण्यासाठी 7 लक्ष असा एकूण 86 लक्ष रुपयांचा निधी दिला होता. सदरील विकास कामे पूर्ण झाली असून या विकास कामांचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच आगरवडगाव येथे मोहमंदिया मस्जिद समोरील जागेत सुशोभीकरण करण्यासाठी 10 लक्ष, मारोती मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी 5 लक्ष, भिवधानोरा येथे सुमतीलाल यांचे घर ते दादा राठोड यांच्या घरापर्यंत सी.सी.रोड करण्यासाठी 10 लक्ष, भिवधानोरा येथे गाव अंतर्गत सी.सी.रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, धामोरी बु. येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोरील जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी 10 लक्ष, तांदुळवाडी येथे समाज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 5 लक्ष, तळपिंप्री येथे गाव आंतर्गत सी.सी.रस्ता करण्यासाठी 5 लक्ष, सावखेडा येथे गाव अंतर्गत रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, मांगेगाव येथे गाव अंतर्गत सी.सी.रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, अमळनेर येथे कब्रस्तान परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 10 लक्ष, लखमापूर येथे गाव अंतर्गत सी.सी.रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, गणेशवाडी येथे गाव अंतर्गत सी.सी.रस्ता करण्यासाठी 10 लक्ष असा एकूण 1 कोटी 5 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले

याप्रसंगी बोलतांना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी गंगापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांना विविध विकास कामे करण्याचे मी आश्वासन दिले होते. अखेर या आश्वासनाची पूर्तता केल्याचा निश्चितच आनंद होत आहे.तालुक्यातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यामुळे यापुढे देखील गंगापूर तालुक्यासाठी आपण भरीव निधी देण्याचा प्रयत्न करू.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगापूर तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, गंगापूर विधानसभा अध्यक्ष अशोक गायकवाड, युवकचे तालुकाध्यक्ष राजू पठाण, रमेश निश्चित, तुकाराम सटाले, सरपंच रामेश्वर चव्हाण, ह.भ.प.मुकुंद महाराज विधाटे, दादाराव रहाटवाड, ज्ञानेश्वर दुधारे, सुधीर माने, सरपंच भगवान सटाले, उपसरपंच अशोक नवथर, काकासाहेब हिवाळे, सरपंच अस्लम शेख, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वाघ, इब्राहिम शेख, विकास सुखधान, माजी सरपंच काकासाहेब म्हसरूप, माजी सरपंच भाऊसाहेब नवरंगे, अस्लम शेख, संतोष गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब चव्हाण, शंकर जाधव, मच्छिंद्र हिवाळे, रावसाहेब हिवाळे, गौतम किर्तीशाही, सचिन विधाटे, एकनाथ खंडागळे, दत्ता पारधे, विजय उगले, शाहिद पटेल, विनायक दुबिले, उद्धव विधाटे, कृष्णा बोबडे, सरपंच लक्ष्मण मनोहर, उपसरपंच ताराचंद दुबिले, विलास शेंगुळे, सरपंच विष्णू मुळे, उपसरपंच भास्कर केदारे, आर.आर.मुळे, उपसरपंच रवींद्र गावंडे, विठ्ठल गावंडे, मारोती साळवे, ह.भ.प.आसारामजी महाराज, सरपंच लवकुश कर्जुले, ज्ञानदेव मिसाळ, समत पठाण, सरपंच रघु चोरमले, प्रल्हाद निर्फळ, बाबा गायकवाड, मोसीन शेख, संतोष बिरुटे, नानासाहेब सोनवणे, प्रकाश निर्फळ आदींची उपस्थिती होती.

जोगेश्वरी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण थोरात यांनी आज गंगापूर येथे आ.सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, शहराध्यक्ष फैसल चाऊस, विलास सौदागर, प्रल्हाद निर्फळ, कृष्णा बोबडे आदींची उपस्थिती होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!