सन्मान स्त्री शक्तीचा” आंतर शालेय एकांकिका स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगावची बाजी.ठरले दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी.

गंगापूर दि. (प्रतिनिधी) “सन्मान स्त्री शक्तीचा” आंतर शालेय एकांकिका स्पर्धेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगावच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत दुसरा क्रमांक पटकावला.
होलीक्रॉस मराठी प्राथमिक शाळा छावणीच्या पालक-शिक्षक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “सन्मान स्त्री शक्तीचा ( आधुनिक स्त्रिया )” या विषयावरील आंतर शालेय एकांकिका स्पर्धा गुरुवार ५ रोजी पार पडली.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगावने “एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सन्मान देत यशदायी रस्ता दाखवा” या संकल्पनेवर आधारित “स्त्रीयांचा नात्यातील भावबंध” या विषयावरील एकांकिका सादर केली.सहभागी विद्यार्थ्याना मुख्याध्यापक रावसाहेब थोरात,गीतांजली साळुंके- हिवाळे,शीतल जाधव- तुपे, मुजीब सय्यद यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले.
यश मिळवणाऱ्या चमूत राणी पल्हाळ (सासुबाई),वैष्णवी शेळके (सुनबाई ),मानसी शिरसाट (ननंद बाई ),आकांक्षा शेळके (नवरा ),रितिका पल्हाळ (मुलगी ),संकेत शेळके (मुलगा ) या इयत्ता १ ली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.विशेष म्हणजे या एकांकिकेचे नाट्यलेखन : गितांजली साळुंके व दिग्दर्शन : शीतल जाधव या शिक्षिकांनीच केले.
स्मृतीसन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, खाऊ देऊन सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले.परीक्षक म्हणून ॲड. सुजाता पाठक, दत्तात्रय जाधव यांनी काम पाहिले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ख्रिस्तीन,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे,पालक उपाध्यक्ष सतीश काटकर,रिना शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाटय चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे,विद्यार्थ्यांचे कलागुण वॄद्धींगत व्हावेत यासाठी “रंगमंच आमचा,कलाविष्कार तुमचा.” हे ब्रीद वाक्य घेऊन इयत्ता १ ली ते ४ थीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!