रमजाननिमित्त गंगापूर येथे नाहादी पेट्रोल पंपाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

गंगापूर,(प्रतिनिधी)नाहदी पेट्रोल पंप येथे रोजा इफ्तार पार्टीला सर्व धर्मीयांसह नेत्यांनी घेतला आस्वाद 
सध्या मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे.

हिंदू – मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या या महिन्याच्या उत्सवात दररोज मुस्लीम बांधव इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात हिंदू मुस्लिम सर्व समाजात एकोपा रहावे याच अनुषंगाने गंगापुर येथील जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी उपनगराध्यक्ष खालेद  नाहदी – व जुबैर  नाहदी यांच्याकडून सालाबादप्रमाणे  नाहदी पेट्रोल पंप येथे रोजा इफ्तार पार्टीचे ३१ मार्च रोजी सांयकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील , कृष्णा पाटील डोणगावकर,आय काँग्रेस पक्षाचे नेते किरण पाटील डोणगावकर, मारुती खैरे, वाल्मीक सिरसाट,मोहसीन चाऊस, डॉ आबासाहेब शिरसाट,अविनाश पाटील, बाळू शेठ, मच्छिंद्र देवकर कैलास साबणे, जुबेर नाहादी, फैसल नाहादी, माजी सरपंच सिकंदर पहलवान, रिजावन पठाण,फैसल चाऊस, संतोष अंबिलवादे, रामेश्वर नावंदर,सुरेश नेमाडे, सोपान देशमुख, राजु मोरे, युवराज गुंदेजा, बाळु गुंदेजा, गुलाम शहा, शेख बाबू, अयुब नाहादी, राजेश बजाज, फारेस नाहादी, अयुब शेख, फैसल बासाेलान, विजय वरकड, अफरोज शेख, श्रीलाल गायकवाड, इमरान बागवान, अब्दुल रहीम बागवान, वजोद कुरेशी, बाबू मनियार, तस्लीम टेलर, सय्यद नवाज, मुजीब शेख आदीसह सर्व सामाजिक , राजकीय, शैक्षणिक वकील, डॉक्टर , सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!