धक्कादायक. फुस लावुन अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन केला बलात्कार. गंगापूर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

गंगापूर (प्रतिनिधी) लग्नाच्या भूलथापा देत फुस लावुन पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
लग्नाचे आमीष दाखवून १६ वर्षांच्या मुलीला नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नवनाथ बाबासाहेब चौधरी(वय २३, रा. अमरापुर तालुका वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पॉस्को, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की नवीन कायगांव येथे मामाकडे आलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी २६ मार्च रोजी दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना नवनाथ चौधरी याने तिला पळवून नेल्याची माहिती मिळाली. तो त्या मुलीसह वेगवेगळ्या ठिकाणी राहात असून, तो सध्या विरगांव मध्ये असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कुंभार यांना मिळाली. त्यावरून त्यांनी व कर्मचाऱ्यांनी विरगांवला जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
पीडितेची वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले असून या प्रकरणी फुस लावुन पळवून नेवून बलात्कार केल्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नवनाथ चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कुंभार ह्या करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!