मानवाने महापुरुषांचा आदर्श घेऊन जीवन जगावे – आमदार प्रशांत बंब

गुरु धानोरा येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पूर्णआहुती यज्ञाला राजेश्वरी गिरी महाराज व आमदार प्रशांत बंब यांनी आहुती दिली.

गंगापूर (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील गुरु धानोरा
येथे भगवान श्रीराम, महादेव, विठ्ठल रुख्मिणी या देवतांची त्रिदिनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २२ जानेवारी रोजी राजेश्वरगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.यावेळी व्यासपीठावर भाजपाचे आमदार प्रशांत बंब, भाजपचे कृष्णा सुकासे, ज्ञानेश्वर म्हस्के, रज्जाक पठाण, अतुल रासकर, गोपाल वर्मा, कृष्णकांत व्यवहारे, राष्ट्रवादीचे डॉ. ज्ञनेश्वर निळ, बीआरएस पक्षाचे संतोष माने, शिवसेनेचे रावसाहेब टेके, कारभारी दुबिले, शेतकरीनेते राहुल ढोले,सरपंच संध्या विनोद इथापे, ग्रामविकास अधिकारी विनय आरमाळ, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सप्ताह काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत कीर्तनकारांकडून समाजप्रबोधन करण्यात आले. राजेश्वरी गिरी महाराज यांनी कीर्तनातून आईवडिलांचा सांभाळ करत आईवडिलांची सेवा हाच धर्म असल्याचे सांगुन शेकडो वर्षापासून सुरू असलेला रामाचा वनवास खऱ्या अर्थाने आज संपला असल्याचे सांगत महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या लीलांचे वर्णन त्याचप्रमाणे अवतार संपेपर्यंत जीवनप्रवासावर प्रबोधन केले. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी बोलताना सांगितले की मानवाने महापुरुषांचा आदर्श घेऊन जीवन जगावे. लवकरच या मंदीर परिसरात सभामंडप करण्याचे आश्वासन दिले. बाळासाहेब जोशी गुरु धानोरकर यांच्या यांच्या पौराहीत्याखाली दीपक जोशी वेदमूर्ती सतीश खोचे, बाळी अंकुश गुरू, अरुण जोशी, मनोज जोशी, सार्थक जोशी यांच्या वेद वाणीतुन व गावातील उपस्थित लक्ष्मीनारायण जोडप्यांच्या साक्षीने मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. अयोध्येच्या कारसेवेमध्ये कारसेवक म्हणून हजर असलेल्या परिसरातील कार सेवकांचा, सप्ताह मध्ये सहकार्य करणाऱ्या परिसरातील गायक वादक गुंनीजन मंडळींचा, सेवाधारी मंडळींचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.महाप्रसाद दहीहंडीच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. युवा महिला पुरुषांचा सहभागाने कार्यक्रमाचे लक्ष वेधले. शेंदूरवादा परिसरातील मांडवा, नागापूर, धामोरी, सावखेडा, मांगेगाव, दहेगाव, माळवाडी, टेंभापुरी, येथेही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!