वारे गंगापूर नगरपालिका, तुमचे अप्रतिम काम, मेलेली जनावरे रस्त्यावर फेकून, जिवंत माणसाची अवस्था दयनीय केली. नपच्या स्वच्छता विभागाने मेलेले मोकट जनावरे उघड्यावर फेकून दिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात


गंगापूर (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून गंगापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लासुर स्टेशन रोडवर असलेल्या डंम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याबरोबर मेलेले मोकाट जनावरे उघड्यावर फेकून दिल्याने भयंकर दुर्गंधी पसरली असून परीसरातील नागरिकांचे आरोग्य या दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असलेल्या गंगापूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून गंगापूर लासुर स्टेशन रोडवर असलेल्या नगरपालिकेच्या कचरा डेपोवर सध्या मेलेले अनेक डुक्कर व त्यांची पिल्ले नगरपालिकेने उघड्यावर टाकलेले आहेत व ही मेलेले जनावरे सडल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आहे त्यामुळे कचरा डेपो शेजारी असणाऱ्या शेतकरी बांधवांचे व नागरिकांचे आरोग्य या दुर्गंधीमुळे धोक्यात आले असून साथीचे आजार पसरण्याचा धोकाही नाकारता येत नाही मात्र नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात घातले आहे यावर आणखी कहर म्हणजे या ठिकाणी टाकलेला कचरा नगरपालिका पेटवून देत असते या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक कागद व विविध प्रकारचे हॉटेल हॉस्पिटलचे टाकाऊ पदार्थ यात असल्याने पेटवून दिल्यानंतर प्रचंड प्रमाणात धूर व धुराचे लोट परिसरात उठतात त्यामुळे लासुर कन्नड व गंगापूरकडे जाणाऱ्या मोटर सायकल स्वार व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना यां धुराचा व दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व आजूबाजूला असणारे शेतकरी व नागरिकांना या दुर्गंधी व धुरामुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात तरीही नगरपालिका प्रशासन ढीम्म असून कुंभकर्णी झोपेत आहे मात्र मेलेली जनावरे अशा प्रकारे उघड्यावर फेकून नगरपालिका मेलेल्या मुक्या जनावरांची विटंबना करत असल्याचे नागरिकात दबक्या आवाजात बोलले जात आहे विशेष म्हणजे या मेलेल्या जनावरांमध्ये डुकरांचा समावेश आहे व या मेलेल्या डुकरांमध्ये नुकतेच जन्मलेल्या नवजात डुकरांच्या पिल्लांचा ही समावेश आहे ही विशेष व गंभीर बाब आहे मात्र या सर्व प्रकाराकडे लक्ष कोण देणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहणार आहे.
सध्या नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे ही अवस्था झाली आहे.
वारे गंगापूर नगरपालिका तेरा कमाल, मर गये जानवर फेक दिये रोड पर जिंदा इन्सान हो गया बेहाल… अशी म्हणण्याची वेळ शहरातील नागरिकांवर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!