गंगापूर येथे राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेला सुरवात. डॉ आबासाहेब सिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त स्पर्धेचे आयोजन

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर येथे डॉ आबासाहेब सिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान गंगापूर, हॅन्डबॉल अकॅडमी गंगापूर आयोजित राज्यस्तरीय खुल्या हॅन्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुंबई पोलीस अ, आष्टी, वेरूळ, संभाजीनगर,पुणे, कोथरूड, गंगापूर,मुंबई पोलीस ब, मंगळवेढा, चाळीसगाव अ , वैजापूर, चाळीसगाव ब, गंगापूर अश्या सोळा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे दिवस रात्र होणाऱ्या या सामन्यांत सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात मंगळवेढा विरुद्ध चाळीसगाव ब हा सामना 20:22 असा मंगळवेढा संघाने विजय संपादन केला तसेच दुसऱ्या सामन्यात पुणे विरुद्ध चाळीसगाव अ या सामन्यात चाळीसगाव संघाने 28:30 अश्या गोल च्या फरकाने विजय नोंदवला तिसऱ्या सामन्यात वेरूळ विरुद्ध मुंबई पोलीस अ या संघात झालेल्या सामन्यात 12:19 अश्या गोलच्या फरकाने मुंबई पोलीस संघाने विजय नोंदवला या स्पर्धेच्या उदघाट्नासाठी माजी नागराध्यक्ष संजय जाधव, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अविनाश पाटील, तालुका प्रमुख दिनेश मुथा,माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस,श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान चे अध्यक्ष वाल्मिक सिरसाठ, विश्वजित चव्हाण,अमोल दादा जगताप, राकेश कळसकर,राहुल वानखेडे, प्रदीप जैस्वाल,विशाल गायकवाड, उदय तगरे, महावीर कटारिया,कांता टेमकर,सोपान देशमुख आदी उपस्थित होते यावेळी गंगापूर शहराच्या क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या क्षेत्रात डॉ आबासाहेब सिरसाठ यांचा मोलाचा वाटा आहे अश्या स्पर्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त होणं म्हणजे खेळाडूंसाठी नक्कीच एक पर्वणी असेल याचा फायदा खेळाडूनी नक्कीच करून घ्यावा या स्पर्धेसाठी जुनेद शेख, मुक्तार शेख, प्रवीण पुलाटे, श्रीकांत कुमावत, प्रसाद कुलकर्णी, प्रमोद महाजन, गणेश चव्हाण,जुबेर बागवान, अलीम पटेल, प्रवीण बर्फे, प्रसाद जाधव, जालिंदर खाजेकर, अजय गायकवाड,अमोल बागले, तेजस कुमावत, अजय उबाळे, अब्दुल बागेस तसेच सर्व श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान व हॅन्डबॉल अकॅडमी गंगापूर डॉ आबासाहेब सिरसाठ मित्र मंडळाचे सर्व सदस्य प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!