भगवान महावीरचा २६२३ वा जन्म कल्याणकारी महोत्सव रवीवारी गंगापुर सकल जैन सामाजाच्या वतीने साजरा करण्यात आला.

गंगापूर (प्रतिनिधी) : –  गंगापूर शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

महावीर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेनंतर घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले

२१ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता गंगापूर शहरातील जैन मंदिरापासून शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते भगवान महावीर यांची प्रतिमा सजविलेल्या रथातून वाजत गाजत काढण्यात आली

महिला, पुरुष बाल युवकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. सर्व जैन बांधवानी पांढरे वस्र तर महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या . जैन मंदिरातून निघालेली प्रभात फेरी शिवाजी चौक,गणपती चौक,मारोती चौक,तीनकोनी चौक,राजीव गांधी चौक,आंबेडकर चौक मार्गे   स्व. ताराचंद गंगवाल मंगल कार्यालयात विसर्जित करण्यात आली. त्यानंतर जैन स्थानक मध्ये  पूज्य. नम्रता जी म.सा.पूज्य सुव्रताजी जी म.सा.,पूज्य  सुप्रग्याजी म.सा.,पूज्य अर्जीताजी जी म.सा.चे प्रवचन झाले आणि नतंर दिगंबर जैन मंदिर मध्ये अभिषेक करण्यात येवून सकाळी १०.३० वाजता  स्व. ताराचंद गंगवाल दिगंबर जैन मंगल कार्यालय या ठिकाणी महावीर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात उपस्थित जैन समाज बांधवांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानाचे हे  चोविसावे वर्ष आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकलजैन बांधवांनी विशेष परिश्रम घेतले धोंगडे परीवारा तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!