गंगापूर शहरातुन एक वर्षाच्या मुलीसह आई बेपत्ता


गंगापूर (प्रतिनिधी) घरात कुणाला काहीही न सांगता शहरातील लगडवस्तीवर राहणारी मुक्ता गणेश लगड(वय २२) ही सोमवारी ८ एप्रिल रोजी आठ वाजेच्या सुमारास घरातुन एक वर्षाच्या बाळाला घेऊन निघून गेली आहे.

ती तेव्हांपासुन अद्यापपावेतो घरी आला नाही. त्यामुळे त्यांचा नातेवाईकांकडे, त्याच्या मित्रमंडळीकडे व आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला. मात्र ते अद्याप मिळुन आली नाही. याप्रकरणी पती गणेश लगड, (३२) राहणार लगडवस्ती गंगापुर, जिल्हा छ. संभाजीनगर यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात
पत्नी मुक्ता वय २२ वर्षे व मुलगी नामे प्राजल वय १ वर्षे असे घरी काही एक न सागता घरातुन निघुन गेली असुन तीला मानसोउपचार तज्ञ डॉक्टारच्या गोळया चालु आहेत.
बेपत्ता विवाहीतेचे वर्णन असे मुक्ता गणेश लगड, वय -२२ वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार लगडवस्ती गंगापूर, केस -काळे, उंची ५ फुट ०२ इंच, रंग गोरा, सडपातळ बांधा, अंगात गुलाबी रंगाची साडी, पायात काळ्या रंगाची सॅन्डल. २. प्रांजल गणेश लगड वय ०१ वर्ष रंग गोरा मुलगी भाषा मराठी, बोलतो येते.
मुक्ता गणेश लगड व एक वर्षाचा मुलगी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचा शोध पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डि के थोरे घेत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!