जामगाव येथे बारा गाड्या ओढुन जंगदंबा देवीची यात्रा मोठ्या ऊत्साहात संपन्न.

गंगापूर(प्रतीनिधी )   तालुक्यातील जामगाव येथील जगदंबा मातेची यात्रा उत्साहात पार पडली असुन बारागाड्या ओढुन फटाक्याच्या अतिषबाजीत यात्रेची सांगता करण्यातआली .


२३ एप्रिल चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सालाबाद प्रमाणे नलसाला पावणा-या जगदंबा देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह बारा गाड्या  ओढण्यात  आल्या  तत्पूर्वी सकाळी जगदंबा मातेला शाही स्नान घालून साडी चोळी चढवण्यात येवुन आरती करण्यात आली .त्यानंतर गावातील नागरीकांनी आपली मनोकामना पुर्ण होवुन मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मुलाला लिंबाचा पाला अंगाला बांधुन वाजतगाजत मुलाची गावातुन मिरवणुक काढुन देवीच्या मंदीराच्या पाठीमागे पाण्याने अंघोळ घालतात.दिवसभर देवीला प्रत्येक घरातुन वाजतगाजत येवुन पातळ (साडीचोळी ) नेसवले .सायंकाळी ५ वाजेदरम्यान देवीचे भक्त जिजाबा माने यांची विधिवत गावातून मिरवणूक काढण्यात आली .मिरवणूक पुढे  पुढे जात असताना  ग्रामस्थ  मिरवणुकी बरोबर   जगदंबा मातेच्या मंदिर परिसरात मोठ्या  संख्येने  जमा झाले होते. अवघ्या तासाभरात गावातील आबाल वृद्धांनी  बारागाड्या  पाहण्यासाठी  रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती .बारागाड्या ओढल्या नंतर मंदिर परिसरात रेवड्याची उधळण करण्यात आली उपस्थित भाविकांनी प्रसाद म्हणून  रेवड्या जमा केल्या .सायंकाळी ७ वाजता देवीची आरती झाली .यावेळी  भाविकांनी दर्शनासाठी  एकच गर्दी केली होती . विशेष म्हणजे या यात्रेला बाहेर गावी असलेले सर्वच गावकरी यात्रेसाठी गावाकडे आलेले असल्याने यात्रेच्या दिवशी जामगांव येथे आनंदमय वातावरण पसरले होते  यात्रेचा समारोप बारागाड्या व फटाक्याच्या अतीषबाजीने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!