सरपंच आसिफ पठाण यांच्या मागणीला यश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली भालगाव च्या विविध विकास कामाला मंजुरी…भालगाव येथे विविध विकस कामाचे भूमिपूजन

गंगापूर (प्रतिनिधी)
जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी गंगापूर तालुक्यातील भालगाव येथे विविध विकासकामांना मंजुरी दिली असून १५ ऑगस्ट रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पवार व उपाध्यक्ष सुभान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.
सरपंच आसिफ पठाण यांनी भालगाव च्या विकास कामासंदर्भात वेळोवेळी
जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे व आमदार रमेश बोरणारे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी भालगाव च्या विविध विकास कामासाठी २७ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून सरपंच आसिफ पठाण यांनी पालकमंत्री संदिपान भुमरे व आमदार रमेश बोरणारे यांचे आभार मानले, गाव अंतर्गत विकासकामांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून भालगावच्या सौन्दर्यात भर पडणार आहे.
लवकरच भालगाव येथे पालकमंत्री संदिपान भुमरे व आमदार रमेश बोरणारे यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सरपंच आसिफ पठाण यांनी सांगितले.
मंजुरी मिळालेल्या कामांचे १५ ऑगस्ट रोजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पवार व उपाध्यक्ष सुभान पठाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच आसिफ पटेल उपसरपंच साखरचंद पवार ग्रामपंचायत सदस्य नवाब पठाण,राजू देहडे, महेबूब शहा, जनार्दन करडे ,बाळासाहेब टेमकर गावचे पोलीस पाटील गोरख टेमकर ग्रामसेवक राजेंद्र वाघ, चेअरमन कचरू सुराशे , व्हाईस चेअरमन रशीद पठाण,सतीश दडंगव्हाळ, आयुब पठाण, जब्बार शहा, सद्दाम पठाण, शफिक शेख असिफ शहा,इस्लाम पठाण,निलेश खिल्लारे,प्रवीण दंडवते,सुभाष पवार, आरिफ पठाण,संभाजी टेमकर,अकबर पठाण, निसार पठाण, कलीम पठाण रिजवान शहा, जावेद पठाण, नबी पटेल,माणिक टेमकर, नानासाहेब सुराशे,अरुण टेमकर, सिराज पठाण अकिल पठाण, यांच्या सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!