शंभर रुपये दारुपिण्यासाठी न दिल्याने युवकांचा डोळाच दगडाने ठेचला मांलुंजा येथील घटना.सात आरोपी विरोधात जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल

गंगापूर (प्रतिनिधी)दारू पिण्यास पैसे का दिले नाही म्हणून बौद्ध युवकाचा डोळा निकामी करणाऱ्या सात आरोपीच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन युवकावर जालना येथील एका डोळ्याच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील मालुंजा खुद्रुक या गावात २ मार्च रोजी रात्री पावनेनवु वाजता गावातील काही तरुणांनी गावातील कमानी जवळ उभा असलेला युवक संदीप अशोक तुपे (३६) याला दारू पिण्यासाठी शंभर रुपयाची मागणी केली असता शंभर रुपये दारू पिण्यासाठी देणार नाही असे स्पष्ट सांगितल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर भांडणात झाले तेव्हा उपस्थित असलेल्या सात तरुणांनी युवकास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत विष्णू बरबडे याने दगडाने डोळा ठेचुन काढल्यामुळे त्याचा उजवा डोळा निकामी झाला तुपे यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी शासकीय घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे पाठविले घाटीच्या डॉक्टरांनी डोळा वाचवायचा असेल तर गणपती नेत्र रुग्णालय जालना येथे भरती करण्यास सल्ला दिल्याने सदर युवकांवर जालना येथील गणपती नेत्र रुग्णालयात ३ मार्च रोजी दुपारी 3 च्या दरम्यान उपचार सुरु केले, तेथील डॉक्टरांनी डोळा निकामी झाल्याचे सांगुन सर्जरी करण्याचा सल्ला दिला
या घटनेची माहिती मिळताच गंगापूरचे रिपब्लिकनचे सेनेचे बाबा भिवसने आनंद भिवसने, नवनाथ नरवडे, राहुल सोनवणे, नारायण फुलारे, आदी कार्यकर्त्यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली सविस्तर माहिती पोलिसांनी सांगितले त्यानुसार पोलिसांनी जखमी युवक संदीप अशोक तुपे यांचे वडील अशोक सोनाजी तुपे यांच्या फिर्यादी वरून आरोपी विष्णू आंबादास बरबडे,वाल्मिक अशोक पवार, पवन अशोक चौधरी,श्रीकांत अशोक चौधरी,पंकज बाबासाहेब कवडे,माणिक साहेबराव मनाळ, चेतन काका वाघचौरे, सर्व राहणार मांलुंजा खु. या सर्वांच्या विरोधात कलम ३२४,३२३,५०४,१४३,१४७,१४८, १४९, व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ .३(१)(आर), ३(१)(एस) ,३(२)(व्ही ए) नुसार ४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपी फरार असल्याचे सांगितले अद्याप एकही आरोपीला अटक नाही. वरील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृती विरोधी समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक औरंगाबाद यांच्याकडे केली आहे जर आरोपी तातडी पकडले गेले नाही तर दोन दिवसांमध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे. मौजे मालुंजा गावात सध्या पोलिसांनी छावणीचे रूप धारण केले असून गावात तणावपूर्ण शांततामय वातावरण आहे पुढील तपास पोलीस उप विभागीय अधिकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!