शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ रवाना

गंगापूर (प्रतिनिधी)शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय
टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ रवाना

शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलिबॉल असोसिएन आयोजीत 25 व्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी गंगापूर येथे छत्रपती संभाजी नगर जिल्हा टेनिस हॉलीबॉल मुले व मुलींच्या संघाची निवड चाचणी गंगापूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झाली होती या निवड चाचणीमध्ये 52 मुले व 37 मुलींनी सहभाग नोंदविला या खेळाडूंमधून जिल्हा संघाची निवड करण्यात आली निवड झालेले संघ पुढील प्रमाणे 17 व 19 वर्षांआतील मुले पवन खाडे, शुभम खाडे, अभिजित पवार, तेजस गाणार, शिवम गाणार, पूनित वाहुळ, स्वराज नरोडे, यश पाठे, शार्दुल सिरसाठ, प्रशांत खोसे, कन्हैया राजपूत, सार्थक चव्हाण 17 वर्ष आतील मुलींचा संघ अक्षदा हिवाळे, किरण बेडवाळ, श्रेया गायकवाड, सेजल म्हस्के, सिद्धी हिवाळे, तनवी कर, श्रुती पवार 19 वर्षाआतील मुली कानिष्कां गिरे, पलक साळुंके, भाग्यश्री सुरासे, आरुषी भोले, रुद्रानी साळुंके, कार्तिकी सूरासे या संघाला मार्गदर्शक डॉ उदय डोंगरे, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल अध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, सचिव प्रमोद महाजन, करण खोमणे, प्रशिक्षक मेहमूद पठाण, अब्दुल बागेस, विलास राजपूत ,नईम शेख,प्रशांत उबाळे,रामदास सरसर,अमीन पटेल,मुक्तर शेख,शैलेश सोनवणे जीवन बैनडे,सह आदींनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेतून निवड झालेला संघ पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!