ग्रामीण पोलिसांच्या दामीनी पथकाने पालकांचे समुपदेशन करून गंगापूर येथील होणारा बालविवाह थांबविला


गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील एका मंगलकार्यालयात बालविवाहाची तयारी सुरू असताना दामीनी पथकाने समुपदेशन करून विवाह रोखला.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, दामिनी पथक प्रमुख सपोनि आरती जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, गंगापूर शहरातील लासूर रोड येथील दिपाली लॅान्स येथे एका अल्पवयीन मुलीचा ३० जानेवारी रोजी बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहीती मिळाल्यावरून
पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, यांच्या सूचनेप्रमाणे दामिनी पथकाचे सपोनि आरती जाधव यांनी तात्काळ गंगापूर येथे जाऊन पाहणी केली असता तेथे विवाह सोहळ्याची पूर्ण तयारी दिसून आली. यावरून दामिनी पथकाने तात्काळ मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली असता हे कुटुंब दहेगावने ता शेवगाव जि अहमदनगर येथील असल्याचे समजले त्यांना विश्वासात घेऊन अधिक चर्चा केली असता नात्यातीलच चांगल्या नोकरीला असलेल्या मुलाचे लग्नासाठी मागणी आल्याने त्यांनी मुलीचा विवाह लावून देत असल्याचे मान्य केले. परंतु सपोनि आरती जाधव यांनी मुलीच्या गावाकडे दहेगावने, शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील मुलीच्या शाळेतून निर्गम उतारा घेऊन तपासला असता तिचे वय १६ वर्ष १ महिना असल्याचे निष्पन्न करून ती अल्पवयीन असल्याबाबत आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिले.
दामिनी पथकाचे सपोनि आरती जाधव व चाईल्डलाईनचे समुपदेशक आम्रपाली बोर्डे यांनी बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्याबाबत होणाऱ्या दुष्परिणामाबाबत व कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देऊन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले त्यामुळे आई वडील त्यांचे मन व मत परिवर्तन होऊन त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले आहे.
तसेच मुलगी ही सज्ञान झाल्यानंतरच तिच्या मर्जीनुसार तिचा विवाह करू असे आवर्जून सांगितले.
याविषयी चाइल्डलाईन चे समुपदेशक बोर्डे यांनी याबाबत बंधपत्र लिहून घेऊन सदर मुलीला बालकल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येऊन त्यांचे निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी अशाप्रकारे होणाऱ्या बाल विवाह रोखण्यात अग्रेसर व सक्त भूमिका घेऊन यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे अल्पवयीन मुलीचे विवाह करणाऱ्या पालकांचे मन परिवर्तन करून अत्यंत समजस्याने बालविवाह रोखले आहे.

यावेळी मुलींच्या आई वडील व इतर नातेवाईक यांना बालविवाह संदर्भात कायदेशीर बाबीचे माहिती देऊन मुलीचे अल्पवयात लग्न करणे हा कायदेशीर रित्या गुन्हा असून अशी जाणीव पूर्वक बालविवाह ठरविण्यास किंवा त्यास प्रोत्साहन तसेच सोहळा पार पाडणाऱ्या दोन वर्ष सक्त मजुरी व दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार होऊ शकते यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांचे लवकर लग्न करण्याचा घाट न धरता तिला उच्चतम शिक्षण देण्यास प्रवृत्त करावे, ज्यामुळे भविष्यात मुली स्वतःचे पायावर उभे राहू तिचे स्वतःचे उज्वल भविष्य निर्माण करून समाजात तिची एक विशिष्ट ओळख निर्माण करू शकेल.
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे
स पो नि आरती जाधव पो. ना. कपिल बनकर, म.पो.अ जयश्री महालकर व चाइल्डलाईनचे समुपदेशक आम्रपाली बोर्डे तसेच गंगापूर पो. स्टे. चे पोउनि धुमाळ व मपोह कांचन शेळके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!