सर्वोत्कृष्ट महिला पोलीस अंमलदार पुरस्काराने शिल्लेगांव पोलिस स्टेशनच्या पोलिस अंमलदार जकीया शेख सन्मानित


  • गंगापूर (प्रतिनिधी)
    दिव्य मराठी समूहाकडून आयोजित पोलिस सन्मान २०२४ पुरस्कार शिल्लेगाव पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अंमलदार जाकिया शेख यांना”छत्रपती संभाजी नगर ग्रामीण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट महिला पोलीस अंमलदार “हा पुरस्कार,ज्येष्ठ विधी तज्ञ पद्मश्री उज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
    यावेळी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त मनोज लोहिया ,लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर पोलीस अधिक्षिका मोक्षदा पाटील , छत्रपती संभाजी नगर ग्रामीण उपविभागीय अधिकारी महक स्वामी, राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक झगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्काराबद्दल जकीया शेख यांचे परिवार नातेवाईक व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!