आमदार बंब यांच्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचा बोर्डच गायब.. तर कार्यालयाला लागले कुलूप…


गंगापूर (प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयावरी नाम फलक गायब झाला असून कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याने उलट सुलट चर्चेला शहरात उधाण आले आहे.
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे अन्नत्याग उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गंगापूर तालुक्यात गावोगावी उपोषण, रास्तारोको निदर्शने चालू असताना ३० आक्टोंबर रोजी मराठा आंदोलकांनी आमदार प्रशांत बंब यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून तोडफोड केल्याने गंगापूर वैजापूर रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी अलीकडेच आलीशान संपर्क कार्यालय उघडले होते परंतु मराठा आंदोलकांच्या हल्ल्यात आपले कार्यालय सुरक्षित राहावे यासाठी त्यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार , आमदार सतीश चव्हाण जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील यांचे फोटो असलेला डिजिटल बोर्ड काढून टाकत कार्यालयाला कुलूप लावून टाकल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!