उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गंगापूर सभेत रिकाम्या खुर्च्या, कार्यकर्त्यांनसह नागरिकांनी फिरवली पाठ

गंगापूर (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार गंगापूर मध्ये सभेला स्टेजवर येऊन बसलेले असताना मैदानावर रिकाम्या खुर्च्या दिसत असल्याने पैसे देऊन लोकांना बोलवले असल्याची चर्चा शहरात चालू होती.
अजित पवार यांची गंगापूरमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सभा झाली पण या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर बसलेले असताना मैदानावर व्हीआयपीसह रिकाम्या खूर्च्या दिसत होत्या. अजित पवारांच्या सभेत कमी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे पवार काय बोलणार? त्याआधीच रिकाम्या खुर्च्यांनी लक्ष वेधून घेतलं. पवार यांचं भाषण सुरू व्हायच्या काही वेळ आधी मैदानातल्या ७० टक्के खुर्च्या काही काळ रिकाम्या होत्या. अजित पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले नंतर पवार सभास्थळी आले यासभेचं आयोजन आमदार सतीश चव्हाण यांनी केले होते. सभेला गर्दी नसल्यामुळे शहरातील लोकांना पैसे देऊन सभास्थळी आणले तेव्हा मंडपात गर्दी दिसली अशी खमंग चर्चा गंगापूर शहरासह तालुक्यात सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!