राज्यातील, कब्रस्थान, स्मशानभुमी, मधील, नोकरदारांना कायम स्वरूपी, सेवेत रुजू करून घ्या विविध संघटनांची मागणी..


नाशिक विशेष प्रतिनिधी :- सम्पूर्ण राज्यातील, महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद व ग्रामपंचायत, या सर्वच हद्दीतील, मुस्लिम समाज कब्रस्थान (दफनभुमी) तसेच हिंदू धर्मीय, वैकुंठधाम, अमरधाम, (स्मशानभुमी) मधील कामकरणारे, सर्व नोकरदार हे विनाअनुदानित २४ तास, कायम सेवेत, कार्यरत असून, अनेक वर्षां पासून कब्रस्थान,(स्मशानभुमी) अमरधाम मध्ये वेळो वेळी, सतत सेवा देत आहेत, तरी, कर्तव्यदक्ष राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर जलद गतीने, स्थानिक, स्तरीय, ठीक – ठिकाणी सर्व्हेक्षण करून, त्वरित, शंभर टक्के कायमअनुदानीत सेवेत मंजूर करण्याचे आदेश पारित करून सर्व जुने नविन, मजदूर /नोकर, सेवेकरी, धारकांना,सरसगट, कायमस्वरूपी सेवेत रूजू करून घ्यावे व आदेश द्यावे तसेच राज्य शासनाने याबाबत त्वरित आदेश पारित करून संबंधित स्थानिक कार्यालयाकडे, सर्व अधिकार द्यावेत,सर्व वंचित घटक आमच्या असंख्य कामगार, परिवारांस न्याय द्यावा, अशी, जाहीरपणे एकमुखी मागणी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, लोकशाही मराठी पत्रकार संघ, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहीत समिती, हजरत पिर शाहनुर मियाँ हमवी रहे. कब्रस्थान ऍक्शन कमिटी, सभी मेंबर, ऑल कमिटी, नाशिक / जालना /परभणी / औरंगाबाद जिल्हा, कौमे – खिदमत सोशल फाउंडेशन, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, मराठा सेवा संघ, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र मुस्लिम ओ. बी. सी. महासंघ, इंडियन मोमीन फाउंडेशन, स्वाभिमानी सेना, बेरोजगार कामगार आघाडी आदी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर, महाराष्ट्र प्रदेशकार्याध्यक्ष, तथा नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेरू सादिक मोमीन, राज्यप्रमुख सल्लागार सरपंच, अंगतराव गरूड, जालना जिल्हाध्यक्ष शेख हसनमियाँ शेख शब्बीरमियाँ, मंठा तालुकाध्यक्ष, शेख अ.रशीदबाबा शेख जाफर, शेख शाहेद अ. रशिद, शेख हारून शेख मुसा, शेख शोहेब शेख सलीम, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष, हुसेन शब्बीरभाई मोमीन, अब्दुल कादरदादा शेख, हुसेन हाजी बाबा कुरेशी, पैलवान शिवाजीराव धनगे, ज्ञानेश्वर शिंदे, अँड. अतुलदादा लोंढे, राजेंद्र गांगुर्डे, संजय संत, हैदर सैय्यद, मौलाना मुशताक अन्सारी, अ. रहेमान शेख, मौलाना अफजल खान, राजेश गांगुर्डे, मोतीभाऊ वाघ, सिकंदर शाह, शेख अब्दुलदादा खेरवाडीकर, परवेज सांडूभाई शेख, समशेर शेख, मुक्तारबाबा देशमुख, ठेकेदार मुद्दसिरबाबा शेख, पैलवान नाशीर अन्सारी, हुसेन अन्सारी, मोबीन मुलतानी, येवला युवा शहराध्यक्ष राशीद समदभाई शेख, अकबर अन्सारी, निहाल अन्सारी, ईमरान शेख, अकीलबाबा शेख, सलीम मुलतानी, एकबाल अन्सारी, गफ्फार अन्सारी, नफिस अन्सारी, संजय संत, मुसा खान,भाई समीर खान, शब्बीर पठाण, अरबाज कुरेशी, जाकीरभाई मोमीन, शाहीद कुरेशी, समीरभाई सैय्यद, ईरफान शाह, अल्ताफ पठाण, आश्रफ मोमीन, अनिसभाई सैय्यद, अझहर कुरेशी, अ. कादिर कुरेशी, शोहेब शाह, मुजाहीद अन्सारी, भुरेखा जम्मेखामियाँ मुलतानी, रफीक अन्सारी, आदींसह सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!