श्री मुक्तानंद महाविद्यालय येथील आरोग्य शिबीरामध्ये दोनशे जणांची तपासणी.


गंगापूर (प्रतिनिधी) श्री मुक्तानंद महाविद्यालय व गंगापूर उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आरोग्य शिबीर संपन्न झाले
श्री मुक्तानंद महाविद्यालय येथे सोमवार ३० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ. सी.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुदाम लगास, डॉ.शिवाजी निकम, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉ.बी.टी.पवार, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, पर्यवेक्षक डॉ.हरीराम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सी.एस.पाटील म्हणाल्या की, बदलती जीवनशैली तसेच आहार विहारातील अनियमिततेमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. म्हणून आरोग्य तपासणी शिबिराच्या वतीने महाविद्यालयामध्ये दर वर्षीच चार ते पाच असे उपक्रम घेतले जातात. रक्तातील हिमोग्लोबीन नावाचा घटक कमी झाल्यामुळे ब-याच विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक थकवा जाणवतो. परिणामी असे विद्यार्थी अभ्यासवर लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. म्हणून विद्यार्थ्यांनी सकस आणि संतुलित आहार घ्यावा असे मत व्यक्त केले.
यावेळी निरोगी आरोग्य तरुणाईचे या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापकांसाठी मोफत तपासण्या करण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुदाम लगास यांनी सांगितले. या शिबीरांतर्गत रक्ताच्या परिक्षणासाठी महत्वपूर्ण असणा-या सीबीसी, सिकलसेल, अनेमिया टेस्ट, किडणी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, इत्यादी चाचण्या करण्यात आल्या. या शिबीरामध्ये एकूण 200 जणांनी सहभाग घेतला. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य समिती प्रमुख डॉ.सचिन सरोदे, डॉ.शिवाजी घोडके, प्रा. ऋषाली करडे, प्रा.प्रियंका चव्हाण व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!