मुस्कान अनवर शेख या विद्यार्थिनीने धुत कन्या विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला

श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या विद्यालयचा निकाल ९५.६५ %
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर येथील श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या विद्यालय यांची यशाची परंपरा कायम राखली असून यंदा इयत्ता बारावीचा निकाल ९५.६५ % लागला आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनी कु. मुस्कान अनवर शेख या विद्यार्थिनीने ९०.६६% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.इराम शाकीर शेख या विद्यार्थिनीने ८८.३३ % तर कु. पवार ज्ञानेश्वरी संतोष या विद्यार्थिनीने ८७.67 % गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय एवं तृतीय क्रमांक मिळवले .
विद्यालातील एकूण ४६ पैकी ४४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून त्यापैकी १४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्य २२ विद्यार्थिनींनी प्रथमश्रेणी तर 8 विद्यार्थिनींनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.
परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षिकांचे तसेच त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणाऱ्या पर्यवेक्षिका वि.वि.शास्त्री एवं प्राचार्या एस.बी बेंद्रे यांचे संस्थेचे पदाधिकारी माजी खासदार. राजकुमारजी धूत, अक्षयजी धूत शालेय समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार मंत्री तसेच सदस्य तृप्ती सुशीलकुमार मंत्री, प्रविणकुमार सोमाणी, ॲड. दिनकरराव देशपांडे, सुकुमार मंत्री ,संतोष भालेराव राजेंद्र सरोवर आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!