विविध सांस्कृतिक, क्रिडा कार्यक्रमांसह महिलांचे ब्रेन वाॅश करण्यात आले

*विविध सांस्कृतिक, क्रिडा कार्यक्रमांसह महिलांचे ब्रेन वाॅश करण्यात आले*
नाशिक (प्रतिनिधी)”गुरू – आराध्या” फाउंडेशनच्या वतीने उडा़न सपनों की… आणि ब्रेन वॉशिंग प्रोग्राम संकल्पनेतून
संस्थापक अध्यक्षा डॉ.सौ.अर्चनाताई आहेर,गणोरेकर व प्राध्यापक ललित खैरनार यांच्या आयोजनातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या फक्त महिलांसाठी, गृहिणीसाठी गेट टू गेदर कार्यक्रम २ जुलै रविवारी रोजी हॉटेल संस्कृती नाशिक येथे सम्पन्न झाला.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा बहुमान ज्या फक्त गृहिणी आहेत त्यांना देण्यात आला.!

कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.अर्चनाताई आहेर,गणोरेकर यांनी व्यक्त केलं त्यामध्यें संस्थेचा उद्देश , कार्य आणि महिलांमधील क्षमता यांवर प्रकाश टाकला.
प्रा.ललित खैरनार यांनी उपस्थित महिलांना दैनंदिन जीवनातील अनुभव व महिला कश्या स्वरूपात कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करतांना त्या मार्गात आलेले अडथळे कसे पार करून यशस्वी होऊ शकता यांवर मार्गदर्शन केले व या जगात आपले कोण आणि परके कोण याचा शोध कसा घ्यावा यांवर प्रयोगाच्या माध्यमातून मोटिव्हेशनल मार्गदर्शन केलं.
यानंतर डॉ.अर्चना आहेर, गणोरेकर यांनी महिलांचे बालपण, तारुण्य , लग्नानंतर जीवन हे सर्वच जीवन प्रवास नजरेसमोर मांडला, त्यांच्या क्षमता व बलस्थाने यांवर लक्ष देण्यास सांगितले, मेडिटेशन करून आमूलाग्र बदल घडवून आणला त्यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या, तसेच स्त्री शक्ती असल्याने काय काय होत आहे व स्त्री चे सामर्थ्य यांवर सखोल मार्गदर्शन केले.!
यानंतर कम्युनिकेशन गॅप यांवर एक प्रयोग घेण्यात आला.
तसेच पारंपरिक भोजन त्यात आमरस-पुरणपोळीचा आस्वाद सर्वांनी घेतला.
यानंतर जादूचा एक प्रयोग देखील मनोरंजनासाठी झाला, तसेच लकी ड्रॉ घेण्यात आला त्यानंतर संगीतखुर्ची घेण्यात आली.
तसेच वटसावित्री पौर्णिमा निमित्ताने उखाणा स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये ऍडव्होकेट विनया अमित नागरे यांना सर्वोत्कृष्ट उखाणा असे पारितोषिक देण्यात आलेत्याचे व लकी ड्रॉ चे ही बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता करतांना महिलांनी आपले मनोगत व्यक्त केलं व महिलांनी एकत्र येऊन सुंदर ग्रुपडान्स केला .
कार्यक्रमास इतरही महिलांचे, संस्थेचे प्रतिनिधी याचे सहकार्य लाभले.
यांमध्ये “गुरुप्रसाद आहेर” यांनी आलेल्या सर्वच महिलांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रम समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!