महसूल सप्ताहातील घटना पंधरा लाखांची लाच घेणाऱ्या तहसिलदार बहिरमच्या घरी सापडली लाखो रुपयांची रोकड आणि ४० तोळे सोने…

धक्कादायक घटना पंधरा लाखांची लाच घेणाऱ्या तहसिलदार बहिरमच्या घरी सापडली लाखो रुपयांची रोकड आणि ४० तोळे सोने…

*तहसीलदार बहिरमला अटक करून घेवुन जाताना लाचलुचपत विभागाचे पथक*
नाशिक (प्रतिनिधी)
तहसीलदार बहिरमच्याघरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झाडाझडतीत ४ लाख ८० हजार रुपये रोकड व ४० तोळे सोने सापडले आहे. एनसीबीच्या पथकाने काल रात्री तहसिलदारांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे
नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या उत्खननासंदर्भात सव्वा कोटींचा दंड केल्याप्रकरणाची फेरचौकशी करीत असताना, नाशिक तालुक्याचे तहसिलदाराने १५ लाखांच्या लाचेची मागणी केली. सदरची लाच स्वीकारताना तहसिलदार नरेशकुमार बहिरम ४४, रा. मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले व अटक केली आहे.
तकारदाराच्या तक्रारीनुसार, नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथे शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये मुरुमाचे उत्खनन करण्यात आले होते. त्यासंदर्भात नियमानुसार पाचपट दंड व स्वामित्वधन जागा भाडे मिळून त्यांना १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. यासंदर्भात जमीन मालक यांनी या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नाशिक तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांच्या कथनात नमूद केले होते. याबाबत पडताळणी करण्यासाठी लाचखोर तहसिलदार बहिरम याने जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणावेळी बोलावले होते. परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदारास त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याने ते निरीक्षण वेळी उपस्थित होते. त्यावेळी लाचखोर बहिरम याने तक्रारदाराकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामावेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले.त्यानुसार पथकाने ५ जुलै रोजी सायंकाळी कर्मयोगी नगर परिसरात सापळा रचला असता, लाचखोर बहिरम याने १५ लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारली.त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बहिरम याच्या फ्लॅटमध्ये पथकाकडून रात्री उशिरापर्यंत झडतीसत्र सुरू होते.सदरची कारवाई विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, गणेश निंबाळकर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!