गंगापूर शहरात रस्त्यांत गाडी लावल्याने एकावर चाकुने जीवघेणा हल्ला. हल्लेखोर अटक

गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर शहरातील राजीव गांधी चौकातील एका हाॅटेलवर एकावर चाकुने जीवघेणा हल्ला. हल्ल्यात गंभीर जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लतिफ सैय्यद व नातेवाईकांनी सोमवारी ९ आक्टोंबर रोजी रात्री सलीम शहा यांच्या घरी जाऊन रस्त्यावर गाडी का लावली असे म्हणुन सलीम शहा व घरातील महीलांना मारहाण केली होती या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती मंगळवारी १० आक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता राजीव गांधी चौकातील एका हाॅटेलवर बसलेले असताना लतिफ सैय्यद यांच्यावर चाकुने सलीम शहा यांनी वार केला असता त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी शहा यांना पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
नागरिकांनी सलीम शहाला हत्यारासह पोलीसांच्या ताब्यात दिले जखमी लतिफ सैय्यद यांना शकील कुरेशी व स्थानिक नागरिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ सुदाम लगास यांनी प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. सलीम शहा यांना मारण्यासाठी फिल्मी स्टाईलने एक नागरिक पोलिस स्टेशनमध्ये आला असता पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख व पोलिस राहुल वडमारे यांनी त्याला पकडून ताब्यात घेतले.या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये सलीम शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!