गंगापूर मध्ये २९ व्या नेत्र तपासणी शिबिरात ९५ रुग्णांचे डोळे तपासले .

गंगापूर मध्ये २९ व्या नेत्र तपासणी शिबिरात ९५ रुग्णांचे डोळे तपासले…


गंगापूर (प्रतिनिधी)लायन्स क्लब वाळूज, छत्रपती संभाजीनगर व नॅशनल कॉम्प्युटर अकॅडमी यांच्या विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या शिबिरात ९५ रुग्णांची (नेत्र) डोळे तपासणी करण्यात आली असून १७ रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला या रुग्णावर लायन्स नेत्रालय , चिकलठाणा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.


शिबिराचे उद्घाटन दीप्रज्वलनाने करण्यात आले उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश सखारामपंत देशमुख, लायन्स क्लब परतूरचे संस्थापक अध्यक्ष ला. मनोहर खालापुरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिर प्रसंगी माजी न्यायमूर्ती देशमुख यांच्यातर्फे वीस रुग्णांना मोफत चष्मांचं वाटप करण्यात आले.

या शिबिरात लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.योगेश धोत्रे, प्रभाकर वावरे, ला. अमोल धोत्रे, राजेश मांडवे ,नॅशनल कॉम्प्युटर च्या संचालीका ला. उज्वला धोत्रे, विष्णु जगताप, लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ. मंगेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक व सूत्र संचालन प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख लायन्स योगेश धोत्रे यांनी तर आभार ला.अमोल धोत्रे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!