गंगापूरात अजब ठेकेदाराचा गजब कारभार चक्क पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर सिंमेट काॅक्रीटचे काम सुरू.


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात पोष्ट ऑफिस ते मरकज मस्जिद या पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर ठेकेदाराने चक्क सिंमेट काॅक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू केले असून बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या गंगापूर शहरात अनेक सिंमेट रस्त्याचे काम सुरू असून आमदार सतीश चव्हाण यांच्या १० लाख रुपये निधीतून चमणपुरा येथे ४०० ते ५०० मीटर सिमेंट रस्त्याचे काम पोष्ट ऑफिस रोड ते मरकज मस्जिद पर्यंत असुन ठेकेदाराने रस्त्यावर असलेले पेव्हर ब्लॉक काढून सिंमेट रस्त्याचे काम करणे अपेक्षित असताना ठेकेदाराने रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक न काढताच पेव्हर ब्लॉकवर काॅक्रीट ओतुन काम सुरू केले आहे या परिसरातील नागरिकांनी ठेकेदाराला या प्रकरणी जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.हे काम बोगस होत असुन या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!