हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्या बद्दल शेतकरी नेते , लासुर बाजार समिती संचालक संतोष पाटील जाधव यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव.

हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्या बद्दल शेतकरी नेते , लासुर बाजार समिती संचालक संतोष पाटील जाधव यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव
गंगापूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ , पुणे आयोजित हाॅर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्स सत्र क्रमांक 71 हे दिनांक २४ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत पुणे येथील आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती शेषराव नाना जाधव , उपसभापती अनिल चव्हाण , सचिव कचरू रणयेवले व सर्व संचालक मंडळाच्या वतीने शेतकरी नेते माजी.अर्थ व बांधकाम सभापती तथा लासुर बाजार समितीचे संचालक संतोष पाटील जाधव यांना पाठवण्यात आले होते .
या प्रशिक्षणामध्ये ” कृषीमाल निर्यात व्यवयसायची सद्यस्थिती व संधी ” व कृषीमाल ट्रेसनेट व अनुषंगिक कार्यपद्धती ” या विषयावर राज्यस्तरीय निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी ,तर कृषीमाल निर्यातीसाठी आवश्यक नोंदणी कागदपत्रे , कृषीमालाची निर्यात प्रक्रिया प्रत्यक्ष निर्यातीसाठी खर्चाच्या बाबी या साठी मॅग्नेटचे प्रकल्प अधिकारी सतीश वराडे यांनी आणि फळे भाजीपाला निर्यात सुरू करतांना घ्यावयाची काळजी या विषयावर श्रीपाद कुलकर्णी यांनी तर ” पॅकेजिंग व वाहतूक व्यवस्थेचे निर्यातीत असलेले महत्त्व ” या विषयी तुषार खारकर यांनी आयातदार कसा शोधावा व निर्यातीमधील प्रत्यक्ष अनुभव ” सुषमा कोळवनकार यांनी , तर ” कृषीमालाची ब्रॅण्डिंग व मार्केटिंग ” या विषयी विधी अधिकारी विनायक राणे यांनी तर कृषी पणन मंडळाची निर्यात सुविधा केंद्रे , पायाभूत सुविधांची उपयुक्तता , पणन मंडळाच्या योजना व ग्लोबलगॅप प्रमाणीकरण या विषयी समन्वयक जितेंद्र जगताप व संतोष मोरे यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीने सर्व शेतकरी बांधवांना कसा आपल्या पिकवलेल्या शेतमालाचा शॉटिंग , क्लिंनिग , ग्रीडिंग , पॅकेजिंग चे महत्त्व सांगून निर्यातीच्या माध्यमातून फायदा करून देता येईल या साठी आमदार प्रशांत बंब व आमदार रमेश बोरणारे , सभापती शेषराव नाना जाधव , उपसभापती अनिल चव्हाण तसेच सर्व संचालक मंडळ व सचिव ,कर्मचारी यांच्या समन्वयवयाने प्रयत्न केले जातील असे संतोष पाटील जाधव यांनी सांगितले . प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी शेतकरी नेते संतोष जाधव यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला .
शेतकरी शेतमाल निर्यात या विषयावर प्रशिक्षण साठी निवड केल्याने सर्व बाजार समितीचे आभार संतोष पाटील जाधव यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!