क्रेटा कारने दिलेल्या धडकेत गंगापुरचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सिताराम ठोंबरे ठार

क्रेटा कारने दिलेल्या धडकेत गंगापुरचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सिताराम ठोंबरे ठार*

गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मार्गावरील हॉटेल पंचशील समोर स्कुटीला क्रेटा कारने जोरदार धडक दिल्याने स्कुटीस्वार सेवानिवृत्त नायब तहसीलदार सिताराम ठोंबरे ठार झाले ही घटना ३० जुलै रोजी सकाळी दहा वाजता घडली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
राहणार संभाजीनगर सेवानिवृत्त नायब तहसीलदार सिताराम आसाराम ठोंबरे (६२) यांच्या स्कुटीला आज सकाळी नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम जवळील पंचशिल हाॅटेल समोर क्रेटा कार क्रमांक एम एच २३ बि सी ८५९१ च्या चालकाने निष्काळजीपणे स्कुटीला जोरदार धडक दिली असता त्यांचे अपघातात निधन झाले सेवानिवृत्त नायब तहसीलदार सिताराम आसाराम ठोंबरे (६२) हे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त काम बघत होते या प्रकरणी नेवासा पोलिस स्टेशनमध्ये कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठोंबरे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे ते गंगापूर येथील डॉ राजेश गुडदे यांचे मामा होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!