घराला आग लागुन संसार उपयोगी साहित्य जळुन खाक २ ते ३ लाखांचे नुकसान ढोरेगांव येथील घटना

घराला आग लागुन संसार उपयोगी साहित्य जळुन खाक २ ते ३ लाखांचे नुकसान ढोरेगांव येथील घटना

 

गंगापूर (प्रतिनिधी)तालुक्यातील ढोरेगाव येथील घराला शॉर्टसर्किटने आग लागुन घरातील संसार उपयोगी साहित्यासह धान्य जळून खाक झाले यामध्ये तब्बल अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले असून कुटुंब उघड्यावर पडले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ढोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला रमेश रतन कांबळे यांच्या घराला १७ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता हि आग लागली त्यावेळी रमेश कांबळे व त्यांची पत्नी हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते त्यांची मुलगी व छोटा मुलगा हे घर बंद करून आजीच्या घरी गेले होते. घरी कोणी नसल्यामुळे ही बाब लवकर कोणाच्या लक्षात आली नाही जेव्हा घरातून धूर निघू लागला तेव्हा शेजारी राहणाऱ्या अम्रपाली कांबळे यांना घरातून बाहेर धूर येत आसंतानी दिसून आला तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी आग विजवण्यासाठी धाव घेतली
परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे घरातील पूर्ण संसार उपयुक्त साहित्य जळून खाक झाले यामध्ये मुलाचे शालेय साहित्य देखील खाक झाले आहे. घरातील गॅस सिलेंडर होता नागरिकांनी बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टाळला या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून सुद्धा तब्बल दोन ते अडीच तासापर्यंत कोणतीही अधिकारी घटनास्थळी फिरकले नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता.झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!