आईला व्हाॅटसप मॅसेज करुन मराठा आरक्षणासाठी युवकाने गोदावरी नदीत उडी घेतली .


गंगापूर (प्रतिनिधी)आईला मराठा आरक्षणासाठी मी बलीदान देत असल्याचा व्हाॅटसप मॅसेज करुन गोदावरी पुलावरून उडी मारुन तरुणाची आत्महत्या.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगर येथील महेश मोरे या युवकाने १२ मार्च रोजी संध्याकाळी ९ वाजेदरम्यान छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगावटोका येथील गोदावरी नदीच्या पुलावर मोटारसायकल लावुन आईला त्याच्या मोबाईलवरुन इंग्रजीमधून मॅसेज टाकला मिस यु आई,जय व पप्पा मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे, समाजासाठी एक जीव माझा पण. जय तु आईसोबत कायम रहा माझा मम्मी मध्ये खुप जीव आहे पुढे चांगली जिंदगी जगा.आय लव्ह मम्मी असा मॅसेज आईच्या मोबाईलवर टाकून गोदावरी नदीच्या पुलावरून
मराठा आरक्षणासाठी महेश उर्फ ओम मोहन मोरे या युवकांची उडी मारून आत्मबलीदान केले त्याचा मृतदेह १३ मार्च रोजी दुपारी बारा वाजता हाती लागला असुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथील दवाखान्यात नेण्यात आला आहे या प्रकरणी नेवासा पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!