सावधान खिशात मोबाईलचा स्फोट… गंगापूर येथील तरुण जखमी

सावधान खिशात मोबाईलचा स्फोट… गंगापूर येथील तरुण जखमी

गंगापूर (प्रतिनिधी)खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी झाल्याची घटना गंगापूर येथे समोर आली आहे.  

शहरात राहणार्‍या आदेश झोजे यांच्या खिशात आज सकाळी या मोबाईलचा स्फोट झाला. फोन खिशात असताना चालतानाच अचानक त्याचा स्फोट झाला. यामुळे आदेश झोजे यांच्या मांडीला इजा झाल्याने त्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठवले


गंगापूर शहरातील शिवाजी नगर मध्ये राहणारे वकील आप्पासाहेब झोजे यांचा मुलगा आदेश झोजे हा आज सकाळी फिरायला गेला असता त्यांच्या खिशात वन प्लस नाॅर्ड सी ई थ्री लाईट या मोबाईलचा स्फोट झाला. फोन खिशात असताना चालतानाच अचानक त्याचा स्फोट झाला. यामुळे यांच्या मांडीला इजा झाली व पॅंटच्या चिंधड्या उडाल्या आहे.
आदेश झोजे यांनी हा फोन शहरातील मोबाईल दुकानातुन चार महिन्यांपूर्वी घेतला होता. या घटनेत आदेशचा मोबाईल मात्र जळून खाक झाला असून त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!