कामचुकारपणा न करता निवडणूकीचे कामकाज अतिशय काळजीने व गांभर्भीयाने करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गंगापूर (प्रतिनिधी)निवडणूक कामत हलगर्जीपणा करणा-या अधिकारी कर्मचारी यांची गय केली जाणार नाही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विधानसभा मतदार संघाची लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी १३ मार्च रोजी १११ गंगापूर १९ औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक पूर्व तयारीची आढावा बैठक गंगापूर तहसिल कार्यालयात घेण्यात आली . जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कामाच्या अनुषंगाने विविध पथक, क्षेत्रीय अधिकारी, नोडल ऑफिसर यांच्या कडे नेमूण दिलेल्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी सर्व पथक प्रमुख यांच्याशी चर्चा करुन त्यांना कामाच्या प्रगतीबाबत सुचना दिल्या . त्यांच्या समस्या विषयी मार्गदर्शन केले तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी यांची निवडणुकीच्या कायद्यासंदर्भात व कामकाजासंदर्भात सविस्तर माहिती करुन घ्यावी व अभ्यास करावा याबाबतीत लवकरच परिक्षा घेण्यात येणार असल्याच्या सुचना दिल्या. सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या सेवा भारतीय निवडणूक आयोगाने अधिगृहीत केल्या असून यापुढील  येणा-या काळात आपले कार्यालयीन कामकाज संभाळून निवडणूकीच्या कामाला प्राध्यान देण्यात यावे असे सांगितले. सर्व अधिकारी यांनी निवडणूकीचे कामकाज अतिशय काळजीने व गांभर्भीयाने करावे असे अवाहन केले. त्यानंतर तालुक्यातील चाराटंचाई व पाणीटंचाई बाबत सविस्तर आढावा घेतला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रस्ताविक केले.या बैठकीला उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत,तहसिलदार खुलताबाद स्वरुप कंकाळ, सर्व खुलताबाद व गंगापूर पोलिस निरीक्षक , खुलताबाद व गंगापूरचे गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे , गटशिक्षण अधिकारी खुलताबाद व गंगापूर, तालुका कृषि अधिकारी खुलताबाद व गंगापूर, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे नगर परिषद खुलताबाद व गंगापूर व तहसिलदार गंगापूर सतिश सोनी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!