गंगापूर येथे एका युवकाने गळफास घेऊन जीवन संपवले


गंगापूर (प्रतिनिधी) जयसिंग नगर येथील सव्हीस वर्षिय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील जयसिंगनगर येथील रहिवासी दत्तात्रय भाऊराव भिसे (२६) याने घरात कोणीही नसताना पत्र्याच्या घरातील ॲगलला दोरीने गळफास घेतला ही घटना १४ मार्च रोजी दुपारी एक ते दीड वाजता घडली असून पत्नी घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली त्याला फासावरुन काढून स्थानिक नागरिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ मोहमंद साजीद यांनी तपासून मृत घोषित केले.भिसे यांच्या पश्चात आई पत्नी दोन बहिणी व एक दिड वर्षीय मुलगा असा परिवार आहे या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत असुन अद्याप फाशी घेण्याचे कारण समजले नाही.या घटनेमुळे परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!