जलजीवन मिशनमुळे गंगापूर वैजापूर तालुक्यातील १०० वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यातील ही पहिली योजना महत्वकांक्षी ठरेल-आमदार प्रशांत बंब


गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलजीवन मिशन अंतर्गत गंगापूर वैजापूर तालुक्यातील ३७३ गावे ग्रीड पाणी पुरवठा योजना पंप ग्रहाच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी १४ मार्च रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आला.

गंगापूर चे आमदार प्रशांत बंब व वैजापूर चे आमदार रमेश बोरनारे यांच्या शुभ हस्ते सदरील कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यानंतर दोन्ही आमदार व मान्यवर पदाधिकारी,अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामेश्वर मुंदडा,वैजापूर येथील उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप,जिल्हा समनव्यक बाळासाहेब चव्हाण,तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके,उप तालुका प्रमुख डॉ .प्रकाश शेळके,वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण पवार,संचालक प्रशांत त्रिभुवन, लासुर स्टेशनचे उपसभापती अनिल चव्हाण,गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब पदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैजापूर चे आमदार रमेश बोरणारे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, अमळनेर शिवरातील जायकवाडी बॅक वाटर क्षेत्रांतून गंगापूर – वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजना चा शुभारंभ करण्यात आला.ही खूप चांगली योजना असून दोन्ही तालुक्याला जीवनसंजीवणी ठरणार आहे.आम्ही आणि आ.प्रशांत बंब समनव्य ठेवून काम करतोय. दोन्ही तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना खेजून आणली आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाले पण दुष्काळी भागातील महिल्यांच्या डोक्यावरचे हंडे खाली उतरले नाही.सदरील काम कार्यन्वित झाल्यानंतर महिलांच्या डोक्यावरचे हंडे खाली उतरविण्यास ही योजना खूप लाभदायक ठरणार आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत बंब म्हणाले की,
गोदावरी नदीचा पट्टा अपवाद वगळता कायम दुष्काळी भाग असलेल्या गंगापूर, वैजापूर तालुक्यातील
३७३ गावांसाठी कामाची अंदाजे किंमत १०७५.६५ कोटीची
ही पाणी पुरवठ्याची महत्वकांक्षी योजना आहे. या कामाचे निविदा धारक
राजस्थान येथील जयपूर चे जी.सी.के.सी.प्रोजेक्टस अँड वर्कर्स प्रा.ली. यांनी काम घेतले आहे.
जायकवाडी धरण फुगवटा क्षेत्राचा भाग असलेल्या अमळनेर शिवारातून ही योजना कार्यन्वित होत आहे.या ठिकाणी२५ बाय १६ मीटरची विहीर करायची आहे.तसेच१५० मीटर अंतराचा पूल होणार असून त्यास जोडणारा २०० मीटर अंतर बंधारा होणार आहे. अधिकारी, पदाधिकारी आणि संबंधित यंत्रणेने ही योजना टेल टू हेड प्रमाणे प्रामाणिकपणे यशस्वी राबवावी.१०० वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.म्हणून
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यातील ही पहिली योजना महत्वकांक्षी ठरेल.
असे आमदार बंब यांनी सांगितले

यावेळी माजी सभापती नंदकुमार गांधीले, माजी उपसभापती सुमित मुंदडा,कायगावचे सरपंच हरीचंद्र माळी,ग्रामसेवक विजय वांढेकर,
माजी नगरसेवक प्रदीप पाटील,पारस घाटे,वसंत त्रिभुवन,प्रवीण पवार,
मारुती खैरे,मंगेश गायकवाड, कृष्णकांत व्यवहारे,कल्याण गायकवाड, ताराचंद दुबिले,आप्पासाहेब पाचपुते,,राजेंद्र राठोड,संतोष बोरुडे, ज्ञानेश्वर सवाई,नवनाथ सुरासे, सचिन विधाते,राजेंद्र सावंत,अरुण सागर,किरण साळवे, मोहसीन शेख,योगेश चव्हाण,रामेश्वर पाटूळे,पप्पू झिंझुडे ,बबनराव चव्हाण,गणेश शिंदे आणि
कार्यकारी अभियंता दीपक कोळी,उप अभियंता ईश्वर खुणे,प्रकल्प व्यवस्थापण सल्लागार समीर जोशी आदीं सह कायगाव, अमळनेर परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!