गंगापुर लोहगांव मार्गे पैठण जाणारी बस पुन्हा सुरु करा नसता आंदोलनाचा इशारा प्रवाशांनी दिला आहे

गंगापूर (प्रतिनिधी)गंगापुर, सावखेडा ,लोहगांव मार्गे पैठण जाणारी बस पुन्हा सुरु करा नसता आंदोलनाचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

दिवाळी पाडवा भाऊबीज सणाच्या कालावधीत गंगापूर व पैठण एसटी आगाराने लोहगाव मार्गे पैठण धावणारी एसटी गाड्या बंद केल्याने भाऊबीजेसाठी माहेराला येणारे जाणारे महिला व नियमित प्रवास करणारे जायकवाडी धरणग्रस्त गावातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. या मार्गावरील एसटी फेरी सुरू न केल्यास उपोषण ,आंदोलन करण्याचा इशारा प्रवाश्यानी दिला आहे.
एसटी महामंडळ जिल्हा वाहतूक नियंञकाच्या आदेशाने लोहगाव ते पैठण,व गंगापूर सावखेडा लोहगांव मार्गे पैठण सुरू असलेली लालपरी फेरी ऐंन दिवाळी सणासुदीत काळात पैठण व गंगापूर आगाराच्या आगार प्रमुखांनी मनमानीपणे अचानक बंद केल्याने लोहगाव भागातील जायकवाडी प्रकल्पाने विस्थापित झालेले ब्रम्हगव्हाण, मावसगव्हान, लामगव्हान जोगेश्वरी वाडगाव, मुलानीवाडगाव, शेवता, तारूपिपंळवाडी ढाकेफळ,बागाचीवाडी,अमरापूर वाघुडी,विजयपूर, गाढेगाव ,पैठण, शेकटा,तर गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा ,मांडवा, तांदूळवाडी, पांढरओहळ, सावखेडा, मागेंगाव,वझर, औरंगपुर हरसूली, कोंडापूर, आदी गावातील प्रवाश्याची गैरसोय झाली आहे.त्यामुळे भावबीजेला जाणारे येणारे महिला,मुली, शासनाच्या पन्नास टक्के सवलत व जेष्ठ नागरिक महिलाना मोफत प्रवासापासुन वंचित राहावे लागत आहे.तर नियमित, पैठण तिर्थक्षेत्र एकनाथ महाराज समाधी दर्शनाला गंगापूर तालुक्यातुन प्रवास करणारे भाविक व इतर प्रवाश्याचे एसटी अभावी हाल होत आहे.तेव्हा दोन्ही आगाराने एसटी सुरू करावी नसता आगारा समोर उपोषण, आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!