भाजप आणि मित्रपक्षांचा समाचार घेत निवडणूका लागण्याच्या आधीच मोदी सरकारने सर्व भारतातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन निवडणूकीला सामोरे जावे- उध्दव ठाकर

  1. गंगापूर (प्रतिनिधी) हिंमत असेल तर काश्मीर पासुन कन्याकुमारी पर्यंत जेवढे माझे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ कर्जमुक्त करा नंतरच निवडणूका घ्या – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे .

उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून शिवसेना संवाद यात्रेअंतर्गत त्यांनी आज गंगापूर, येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती .ठाकरे म्हणाले, ‘खरी शिवसेना कोणाची हे जनतेला माहिती आहे; पोलिसांना बाजुला करुन जनतेसमोर मी व मिंदे यांनी उभे राहून विचारा खरी शिवसेना कोणाची ते जनताच सांगेल.‘या राज्यातील मोदींची पिलावळ ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’चा धाक दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडत आहे. त्यामुळे आम्हाला देशातील पाशवी बहुमताचे हुकूमशाही सरकार नको.
आम्हाला इंडिया आघाडीचे ‘मिलीजुली’ सरकार चालेल; मात्र जेव्हा आमचे दिवस येतील, तेव्हा व्याजासह परतफेड होईल,’ असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला. ठाकरे म्हणाले, ‘ तुमच्यात हिंमत असेल तर या तपास यंत्रणा बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जा, आमचे शिवसैनिक तसेच राज्‍यातील, देशातील जनता तुम्हाला पायदळी तुडविल्‍याशिवाय राहणार नाही.’’

आता चुकल्यास हुकूमशाही निश्‍चित

‘भाजपमुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. त्‍यामुळे येणारी लोकसभा निवडणूक महत्त्वा‍ची आहे. यावेळी तुम्‍ही चूक केली, तर देशामध्ये हुकूमशाही निश्‍चितपणे येईल. त्यामध्ये तुमच्यासह तुमच्या पुढील पिढ्यांना गुलामगिरी करण्याची वेळ येईल’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आज दिला. भाजपच्या नेत्‍यांनी मूळ भाजप आणि आरएसएसच्या
कार्यकर्त्यांना, नेत्‍यांना बाजूला करून इतर पक्षातील गुंडांचा भाजपमध्ये भरणा केला. विरोधातील पक्ष फोडले जात आहेत. आमच्या बरोबर जागांची वाटाघाटी करणारे काॅग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे नंतर भाजपच्या गोटात जाणार असल्याचे कळते.

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी जे करायचं ते मी केलं,मी तसं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती मी नाही पाप केलं तरी मी जे नागपूरचा पहिला अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केले आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अमलात आणून दाखवली मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट पाहिली नाही.
तुम्ही आता मतांचा बाजार मांडलेला आहात प्रत्येक पक्षाचा कोणीतरी ईडीचा धाक दाखवून पक्षात घेतात आणि पक्षात प्रवेश केला की स्वच्छ होतात.
भाजप नेते म्हणतात शेतकरी, गरीब, तरुण आणि महिला या चार जाती आहेत आम्ही मानतो या चार जाती. मानत असाल तर महिलांसाठी काय करताय अंगणवाडी सेविका अशा सेविकास आंदोलनाला बसलेले आहेत. काय करताय तुम्ही त्यांच्याकडे तरुणांसाठी तुम्ही किती रोजगार आणले, गरिबांसाठी ८० कोटी लोकांना जर तुम्हाला फुकट धान्य द्यावे लागत असेल आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास १४० कोटी आहे. म्हणजे जास्त फुकट धान्य देत असाल तर मग कोणती गरीबी हटवली. काश्मीर पासुन कन्याकुमारी पर्यंत जेवढे माझे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ कर्जमुक्त करा तर आम्ही समजू की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतात
महाराष्ट्रामध्ये हे जर उद्धव ठाकरे करून दाखवत असेल तर देशाचे पंतप्रधान विश्वगुरू सत्तेवरती बसल्यानंतर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची तुम्ही एकत्रित कर्जमुक्ती येत्या निवडणुकीपुर्वी या महिन्याभरात करा आणि त्यानंतर निवडणुका जाहीर करा . जनधन योजना, पिक विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री योजना आरोग्याची योजना महिलांसाठी आणखीन काय असेल ती योजना अद्याप मिळाली की नाही एकदा बघा लोकांमध्ये जा त्यांना विचारा खरच या योजनेचा लाभ सर्व सामान्य माणसाला होतं आहे का?
आज मी जनतेला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की बाकी ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या पण ही माझी शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुखांचा पुत्र ही माझी लढाई लढत नाहीये ही माझ्या जनतेची लढाई लढतोय आणि ते लढणार आणि त्याच्यासाठी माझ्या या महाराष्ट्राच्या कुटुंबीयांना मी साद घालतोय की लढाई उद्धव ठाकरेची नाही ही लढाई माझ्या महाराष्ट्राची आहे माझ्या देशाची आहे मी तुम्हाला साद घालतोय तुम्ही सोबत या आणि या एकाधिकारशाहीला नुसत्या इथल्या गंगापूरच्या आमदाराला पाडून मला काय समाधान नाही.संपुर्ण महाराष्ट्रातील मिंदे सरकार पाडण्यासाठी आपल्याला मी साद घालत आहे.माझ्याकडे काही नाही हे तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा एवढ्या उन्हामध्ये तुम्ही माझ्यासोबत यायला तयार आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने इकडे आलात तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि डोणगावकर तुमच्या कारखान्यातून एवढे साखरेचे उत्पादन काढा की संपूर्ण देशामध्ये जेव्हा आपण विजय मिळवू तेव्हा सर्वत्र हीच साखर आपण वाटप करू जय महाराष्ट्र.
यावेळी उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील, अंकुश सुंब, तालुका प्रमुख दिनेश मुथा, सुभाष कानडे, गणेश आधाणे, विजय पानकडे, कैलास साबणे,उपतालुकाप्रमुख पोपटराव गाढेकर, रविंद्र पोळ, विश्वंभर शिंदे, नागेश चौधरी, नगरसेवक आबासाहेब शिरसाट, उपशहरप्रमुख कैलासराव साबणे,श्रीलाल गायकवाड, नारायण ठोळे, महिला आघाडीच्या अर्चना सोमासे, रुख्मिणी राजपूत , सुशिला देहलोत, गोविंद वल्ले प्रवीण काळे संकेत कदम गणेश राजपूत श्रीलाल गायकवाड वैभव झालटे करून खोमणे विजय राजपूत कांता टेमकर संतोष जोशी मुन्ना भोसले प्रशांत पंडुरे बाबा कराळे लक्ष्मण बहिर विष्णू फुलारे अमोल शिरसाठ नितीन काजूने,आयुब पटेल,पोपट नरोडे, विष्णू पोटे, लक्ष्मण वाघ, बाळासाहेब वाघ, सुरेश नरोडे, मनोज जाधव, भाऊसाहेब आमराव, निर्मला तुपशेंद्र,दत्तु वाघ,बाळु आमराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!