धक्कादायक.. दहा वर्षांच्या मुलीवर नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार.. गंगापूर तालुक्यातील घटना

धक्कादायक.. दहा वर्षांच्या मुलीवर नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत केला *बलात्कार*
गंगापूर (प्रतिनिधी) गळा घोटून मारण्याची धमकी देऊन चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला वाळुज पोलीसांनी अटक केली
मतिमंद आई घरी न आल्याने तिला शोधण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय चिमुकलीला एका पन्नास वर्षीय नराधमाने गळा घोटून जीवे मारण्याची धमकी देत वाळूज येथे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री बलात्कार केला ही अत्यंत निंदनीय व खळखळजनक घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहा वर्षीय चिमुकलीच्या वडीलांचे निधन झालेले असून आई मतिमंद आहे. त्यामुळे पीडित चिमुकली ही मतीमंद आईसह आजोबाच्या घरी राहते. आई मतिमंद असल्यामुळे ती गावात फिरत असते. १ सप्टेंबर रोजी पीडित चिमुकली आईला शोधत असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास वाळूज येथील कमळापूर कमानीजवळ आरोपी दिलीप वाघिल्या पवार हा भेटला. त्याने तिला विचारले असता तिने सांगितले की, मी आईला शोधते. त्यामुळे तो तिला म्हणाला की, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला शोधू. त्यानंतर चिमुकलीच्या आईला पंढरपूर येथून शोधून वाळूज येथे येत असताना रस्त्यातील एका टपरीजवळ ते झोपले. रात्री अंदाजे दिड वाजेच्या सुमारास आरोपीने दहा वर्षीय चिमुकलीला गळा घोटून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र तिच्या वागण्या बोलण्यावरून संशय आल्याने तिच्या नातेवाईकांनी चिमुकलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बलात्काराचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस वाळुज पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढोले करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!