सुवर्णाताई जाधव यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड

सुवर्णाताई जाधव यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड


गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील जिजाऊ महिला फाऊंडेशन अध्यक्षा सुवर्णाताई संजय जाधव यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून त्यांचें सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे

राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी नुकतेच सुवर्णाताई जाधव यांना नियुक्ती पत्र दिले आहे नियुक्ती पत्रात म्हटले आहे की आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील राहाल. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास असुन आपल्या निवडीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
नियुक्ती पत्र देताना प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर आमदार सतीश भाऊ चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष वैशालीताई साबळे पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!