कायगांव टोका येथील उपोषणार्थी शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांची यांची प्रकृती खालावली

कायगांव टोका येथील उपोषणार्थी शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांची यांची प्रकृती खालावली.

गंगापूर (प्रतिनिधी)मराठा आरक्षण लवकर मिळावे यासाठी औरंगाबाद पुणे महामार्गावरील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस्थळाजवळ आमरण उपोषणाला बसलेले उपोषणार्थी शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांची प्रकृती खालावली असून उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी या गावात आरक्षणासाठी शांततेत चालू असलेला मराठा समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असून, अश्रूधाराचे नळकांडे फोडण्यात आले. त्यामुळे पोलिसांचा तसेच प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून सकल मराठा समाजच्या वतीने गावोगावी उपोषणाला बसले आहे
छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळाजवळ ३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होवून बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती आज चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असता त्यांना भेटायला मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील, संतोष माने, रामेश्वर मुंदडा, विनोद काळे, मच्छिंद्र पठाडे, योगेश शेळके, उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड, तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले आदींसह शेकडो नागरिक उपोषणस्थळी आले होते यावेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!