गंगापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…रिपब्लिकन सेना…

गंगापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…रिपब्लिकन सेना…
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करा नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेने दीलाआहे
गंगापूर तहसीलदार यांना रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव बाबासाहेब भिवसने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले की गंगापूर तालुक्यामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून खरिपाची पिके नष्ट झाली असून यात कापूस, मका, तुर, मुग, भुईमूग, सोयाबीन व इतर पिके पूर्णपणे पावसाअभावी करपून गेले आहे शेतकरी बांधव संकटात सापडला आहे शासनाने सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना तातडीत देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून रेशन देण्यात यावी व तसेच गंगापूर तालुक्यातील खाजगी व शासकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात यावा जनावरांसाठी चारा छावण्या निर्माण कराव्यात शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा कनेक्शन बंद करू नये बँकेचे कर्ज माफ करावे रोजगार हमी योजनेतील कामे चालू करावी तालुक्यातील राशन कार्ड धारकांना मोफत राशन देण्यात यावे नसता आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन सेनेने निवेदनात दिला आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव बाबासाहेब भिवसाने, गंगापूर तालुका अध्यक्ष आनंद भिवसाने, गंगापूर शहराध्यक्ष अबू चाऊस, अनिस पठाण, नारायण फुलारे, रवी शिंदे, राहुल सोनवणे, नवाज खान, शकील पटेल, ज्ञानदेव गावंडे, आसाराम बाबा आधीच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!