गंगापूर शहर व तालुक्यासह लासुर स्टेशन येथे मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सकल मराठा समाजाकडून फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला.

गंगापूर (प्रतिनिधी) मनोज पाटील जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यानंतर व राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर गंगापूर शहरात प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात, शिवतीर्थ उद्यान, मारुती चौकात तसेच लासुर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्यावतीने आनंद साजरा करण्यासाठी व विजय मिरवणुकीसाठी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाजाने फटाके फोडुन एकमेकांना पेढे भरुन जय भवांनी, जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा,मनोज पाटील जरांगे तुम आगे बडो अश्या गगनभेदी घोषणानी आसमंत दुमदूमून टाकला त्यामुळे सकल मराठा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विशेष म्हणजे सकल मराठा समाजाबरोबर ओबीसी समाज, व इतर सर्व समाजबंधव यावेळी यां मराठा आरक्षणाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते.मुख्य रस्त्यावर तसेच ग्रामीण भागातील विविध गावात मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाज बांधवांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला तालुक्यात प्रत्येक गांवात पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!