नांदूर मध्यमेश्वर कालव्यातून शेतीसाठी त्वरित आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केल्याने अर्धातास वाहतूक ठप्प.एक डिसेंबरला कालव्यात सोडणार पाणी


गंगापुर (प्रतिनिधी)
हक्काच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांनी गंगापुर संभाजीनगर रस्त्यावर बाबरगाव फाटा येथे सुमारे अर्धातास रास्तारोको आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
नांदूर मध्यमेश्वर कालव्यातून शेतीसाठी आवर्तन तात्काळ सोडावे तसेच नादुरुस्त पोटचाऱ्या तात्काळ दुरुस्त कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी गंगापुर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. वक्ती , पानवी, हनुमंतगाव , लाडगाव , माहुली , संजरपूर, हादीयाबाद, झोडेगाव ,अकोले वाडगाव, म्हस्की , वरखेड, बाबरगाव या भागातील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
कृष्णा दंडे, राजू वाबळे, प्रतापसिंह परिहार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मराठवाड्यासाठी बांधण्यात आलेला एक्स्प्रेस कालवा नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर येथून सुरू होतो. या कालव्यामुळे मराठवाड्यातील वैजापुर गंगापुर तालुक्यातील ६९ गावातील ४२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्यासाठी वरील भाम, भावली, मुकणे व वाकी या चार धरणातून ११.२ टिएमसी पाणी साठा राखीव आहे. नामकाच्या निर्मितीचा उद्देशच मुळात मराठवाड्यातील शेती सिंचनाखाली यावी याकरीता झालेली आहे. मात्र हे फक्त कागदोपत्रीच असून या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा अद्यापही प्रत्यक्ष फायदा झालेला नाही. या दोन्हीही तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगाम वाया गेला. भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना रब्बी साठी या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. पावसाअभावी या भागातील कुपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जर पाण्याचे आवर्तन सोडले नाही तर रब्बीच्या पेरण्या होणार नाहीत त्यामुळे रब्बी हंगाम वाया जाणार आहे. पाण्याचे लवकरच आवर्तन सोडण्यात यावी यासाठी काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी उपोषण देखील केले होते त्यावेळी २१ नोव्हेंबरला पाणी सोडण्यात येईल असे लेखी आश्वासन नामकाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते तरीही पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुकवार २४ नोव्हेंबर रोजी गंगापुर संभाजीनगर रस्त्यावर बाबरगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धातास आंदोलन सुरु होते पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक कायगाव रस्त्याने वळवली होती तरीही वाहनाच्या लांबच लांब रागा लागल्या होत्या.नांदूर मधमेश्वर कालवा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुराशे यांनी आंदोलकांना एक डिसेंबर पर्यंत कालव्यातून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात आत्माराम लाड
बंकटसिंह डोंगरजाळ ,राजु काळे बाळासाहेब गायकवाड
कल्याण घटे जीवनसिंह डोंगरजाळ.
प्रतापसिंह परिहार ,राजु बाबळे, कृष्णा दंडे, कल्याण ताटु, ॲड.भुसारे , अजयसिंह परदेशी ,विठ्ठलसिंह राजपुत, कपुर मेहेर, कपुरचंद निमरोट, सोपान दंडे, सुखलाल डोंगरजाळ ,सुरेश दंडे ,चांगदेव झोजे
आदी शेतकरी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!