गंगापूर कोर्टासमोर टॅम्पोने पाच नागरिकांना उडवलेल्या त्या अपघातातील दुसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू


गंगापूर (प्रतिनिधी) कोर्टासमोर टॅम्पोने फुटपाथवरी नागरिकांसह मोटारसायकल उडवले यात पाच नागरीक जखमी झाले होते यातील दुसरा जखमी विनोद शिंदे याचा २५ मार्च रोजी उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ कोर्टाच्या समोर एम एच १७ के ७८९३ क्रमांकांच्या खडीच्या टॅम्पोने ११ मार्च रोजी दुपारी दिड वाजता भरधाव वेगाने येवून रोडच्या बाजूला लावलेल्या मोटारसायकली व फुटपाथवरील पाच सहा नागरिकांना उठवले या अपघातात चार मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले होते यामध्ये गंगापूर येथील बुलढाणा बॅंकेचे व्यवस्थापक अनंत पिसाट (५८) ,विनोद काशीनाथ शिंदे(२८) राहणार पिंपरखेडा, फातमाबी अमीन पटेल (६५) राहणार गंगापूर, व अमोल एकनाथ कनगरे (२६) राहणार नेवरगांव हे गंभीर जखमी झाले होते यातील फातमाबी अमीन पटेल (६५) राहणार गंगापूर यांचे तिसऱ्या दिवशी निधन झाले होते .विनोद शिंदे याचा पाय व डोक्याला मार लागल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी १९ मार्च रोजी विनोद याला जालना रोडवरील जे जे पल्स हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान विनोद शिंदे याचे २५ मार्च रोजी निधन झाले या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मुळमालक अनिल बाळासाहेब सवई राहणार अव्वलगांव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांच्याकडून गंगापूर येथील नबी बादशहा सैय्यद याने २७ नोव्हेंबर २०२१ रोजी बाँड वर घेतला होता यावरून गंगापूर पोलीसांनी मुळमालक अनिल सवई, नबी बादशहा व चालक यांच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवुन मृत्यूला कारणीभूत धरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक फरार आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डि के थोरे हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!