दारु व कपड्याच्या ट्रकमध्ये झालेल्या भिषण धडकेत दोन्ही वाहने जळुन खाक लाखो रुपयांचे नुकसान

दारु व कपड्याच्या ट्रकमध्ये झालेल्या भिषण धडकेत दोन्ही वाहने जळुन खाक लाखो रुपयांचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) समृद्धी महामार्गावर जालन्याकडे जाना-या देशी दारू व कपड्याच्या दोन ट्रक मध्ये ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात होवून दोन्ही वाहने पेटली अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.या घटनेत जीवीत हानी टळली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी नागपुर नॅशनल हायवे 395 औरंगाबाद ते जालना रोडवरील जयपुर ते करंजगाव दरम्यान जाणार-या देशी दारूचे बॉटल ने भरलेला ट्रक व कपड्याने भरलेला बंद बॉडीचा ट्रक दोन्हीही जालना कडे जात असताना पहाटे अडीच वाजता दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला या अपघातात देशी दारूच्या ट्रक ने पेट घेतला दारूच्या बाटल्यांनी आग धरली असता दारू ही ज्वलनशील असल्याने दारुच्या बाटल्या फुटुन पुन्हा पुन्हा आग भडकत होती या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, करमाडचे पोलिस व फायर ब्रिगेड चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे मुख्य अग्निशमन अधिकारी. शिवाजी झनझन अग्निशमन केंद्र अधिकारी आर के सुरे, उप अग्निशमन केंद्र अधिकारी डि.डि.साळूंके, ड्युटी अधिकारी विनायक कदम, अग्निशामक जवान शेख असलम, मदन ताठे, साई बोरुडे वाहन चालक मिनिनाथ झाड़े आदी घटनास्थळी दाखल होवून ही आग आटोक्यात आणली व महामार्गावरील जाम झालेली वाहतूक पोलीसांनी सुरळीत केली या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आग पुन्हा पुन्हा भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळ लागला. या प्रकरणी करमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!