मोटारसायकल वरील अगरवाडगांवच्या सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू. घात की अपघात चर्चेला उधाण 


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर बोलेगांव रोडवर मोटारसायकलच्या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी झाला असून हा घात की अपघात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार २० फेब्रुवारी रोजी गंगापूर बोलेगाव मार्गावर रात्री साडेआठ वाजेदरम्यान सदरचा अपघात झाला, यातील मयत उमर राजेक शेख (१७) व त्याचा मित्र सूरज पदार हे मोटार सायकल क्रमांक एम एच २० जी एस १६८९ वरून जात असताना हाॅटेल वेदांतच्या पाठीमागे छोट्या चारीमध्ये दोघे एकावर एक पडलेले होते तर मोटारसायकल त्यांच्यापासून दोनशे ते तीनशे मीटर लांब पडलेली होती पदार याने आमचा अपघात झाल्याची माहिती रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांना फोन करून दिली असता सागर शेजवळ व करण खोमणे यांनी घटना स्थळी जावून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले उमर राजेक शेख (१७) राहणार अगरवाडगांव या तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने नाका तोंडातून रक्तस्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता येथील डॉक्टर साजेद शेख यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. तर जखमी सुरज पदार याला उपचारासाठी गंगापूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असून सदरचा अपघात कशामुळे झाला या बाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. हा अपघात आहे की घातपात अशी चर्चा सुरू होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!